अरुंधती रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरुंधती रॉय

अरुंधती रॉय (मल्याळम: അരുന്ധതി റോയ് ; बंगाली: অরুন্ধতি রায় ) (जन्म: २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात) या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे.

पार्श्वभूमी आणि जीवन[संपादन]

अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, मेघालय येथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत.

दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले.

साहित्यिक कारकीर्द[संपादन]

कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात अरुंधती रॉय यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी काम केले, इन विच एनी गिव्ह्‌ज इट दोज वन्स (१९८९) या स्वानुभावावर आधारित चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. इलेक्ट्रिक मून (१९९२) ची पटकथाही त्यांनी लिहिली.

शेखर कपूर यांच्या बँडिट क्वीन या चित्रपटावर केलेल्या टीकेने अरूंधती रॉय प्रथम प्रकाशझोतात आल्या. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही कादंबरी १९९२ मध्ये त्यांनी लिहायला सुरूवात केली आणि १९९६ मध्ये त्यांनी ती पूर्ण केली. या आत्मचरित्रात्मक कादंबरीने १९९७ चा बुकर पुरस्कार प्राप्त केला आणि त्यावर्षीच्या नोंद घेण्याजोग्या पुस्तकांमध्येही त्यांच्या या कादंबरीला स्थान मिळाले.

विवाद[संपादन]

  • काश्मिरप्रश्नी भारत विरोध
  • सरदार सरोवर विरोध
  • अफगाणिस्तान युद्धास विरोध
  • भारताच्या अणुकार्यक्रमास विरोध
  • इस्राएल ला विरोध
  • भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांच्या बाजूने लेखन
  • श्रीलंका युद्ध टीका
  • नक्षलवाद प्रोत्साहन देणारे लिखाण
  • गिलानी व इतर अतिरेक्यांसोबत काश्मिर संदर्भात चर्चा व त्यांना पाठींबा
  • अण्णा हजारेंवर आंदोलन केल्याबद्दल टीका


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.