बालमुरलीकृष्ण
मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा | |
---|---|
एम. बालामुरलीकृष्ण | |
आयुष्य | |
जन्म | ६ जुलै १९३० |
जन्म स्थान | शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश |
मृत्यू | २२ नोव्हेंबर २०१६ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
वांशिकत्व | तेलुगू |
नागरिकत्व | भारतीय |
मूळ_गाव | शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश |
देश | भारत |
भाषा | तेलुगू |
संगीत साधना | |
गुरू | श्री. पंतलु |
गायन प्रकार | कर्नाटक संगीत |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायक |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९३८ - चालू |
गौरव | |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९७१), पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९९१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७५) |
मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा (तेलुगू: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; रोमन लिपी: Mangalampalli Balamuralikrishna), अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, जुलै ६, इ.स. १९३०; - चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.
चित्रपटसृष्टीतील कामगिरी
[संपादन]अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.
जुगलबंदीचे कार्यक्रम
[संपादन]कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरासिया, किशोरी अमोणकर आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत.
नवीन रागांची निर्मिती
[संपादन]डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतात काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले.
बालमुरलीकृष्ण यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]- संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार.
- दिल्लीच्या राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
- फ्रान्स सरकारचा 'ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर' हा सन्मान
- यांशिवाय भारतातील अनेक राज्य सरकारांकडून पुरस्कार.
चित्रदालन
[संपादन]-
एम.बालमुरलीकृष्ण
-
एम.बालमुरलीकृष्ण राजाराणी संगीत महोत्सव, भुवनेश्वर येथे, १९ जानेवारी २०१३
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
- भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते
- विस्तार विनंती
- कर्नाटक गायक
- तेलुगू व्यक्ती
- कलेतील पद्मभूषण पुरस्कारविजेते
- कलेतील पद्मविभूषण पुरस्कारविजेते
- कलेतील पद्मश्री पुरस्कारविजेते
- भारतीय शास्त्रीय गायक
- संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
- इ.स. १९३० मधील जन्म
- कालिदास सन्मान पुरस्कारविजेते
- इ.स. २०१६ मधील मृत्यू