राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
শ্রেষ্ঠ পুরুষ নেপথ্য কণ্ঠশিল্পী বিভাগে জাতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (ভারত) (bn); National Film Award du meilleur chanteur en playback masculin (fr); ナショナル・フィルム・アワード 男性歌手賞 (ja); Penghargaan Film Nasional untuk Penyanyi Playback Laki-Laki Terbaik (id); National Film Award/Bester Playbacksänger (de); פרס הסרטים הלאומי לזמר הפלייבק הטוב ביותר (he); Ազգային կինոմրցանակ լավագույն արական կարդրից դուրս վոկալ (hy); Национальная кинопремия за лучший мужской закадровый вокал (ru); राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार - सर्वश्रेष्ठ पुरुष पार्श्वगायक पुरस्कार (hi); భారత జాతీయ చలనచిత్ర పురస్కారాలు - ఉత్తమ నేపథ్య గాయకుడు (te); ଜାତୀୟ ଚଳଚ୍ଚିତ୍ର ପୁରସ୍କାର - ସର୍ବଶ୍ରେଷ୍ଠ ପ୍ରଚ୍ଛଦପଟ ଗାୟକ (or); National Film Award for Best Male Playback Singer (en); جائزة الفيلم الوطني لأفضل مطرب تشغيل (ar); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (mr); சிறந்த ஆண் பின்னணிப் பாடகருக்கான தேசியத் திரைப்பட விருது (ta) Indian film award (en); جائزة سينمائية هندية (ar); Indian film award (en); இந்தியத் திரைப்பட விருது (ta) ナショナル・フィルム・アワード 最優秀男性プレイバックシンガー賞 (ja)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 
Indian film award
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारfilm award category,
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
स्थान भारत
विजेता
प्रायोजक
  • Directorate of Film Festivals
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक हि एक हि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा मुख्य पुरुष पार्श्वगायकाला त्याच्या सर्वोत्तम गायनाच्या कार्यासाठी देण्यात येणारा सन्मान एक उच्च स्तरावरचा आहे. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पारितोषिकात समावेश होता.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

राज्य पुरस्काराने १९६७ मध्ये "सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक" म्हणून या पुरस्कार श्रेणीची स्थापना केली. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, बंगाली, तामिळ, तेलगू, मराठी, कन्नड आणि पंजाबी अशा आठ प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या गायकांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.

उपकार चित्रपटाच्या "मेरे देश की धरती" गाण्यासाठी प्रथम हा पुरस्कार महेंद्र कपूर यांना १९६७ मध्ये देण्यात आला होता.[१] या श्रेणीतील सर्वाधिक पुरस्कार असलेल्या गायक के.जे. येशुदास तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये (मल्याळम, तेलगू आणि हिंदी) आठ वेळा विजयी झाले आहेत्. त्यानंतर एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी चार वेगवेगळ्या भाषेसाठी मध्ये (हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलगू) सहा वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. शंकर महादेवन (तामिळ आणि हिंदी) आणि उदित नारायण (फक्त हिंदी) प्रत्येकी तीन पुरस्कार पटकावतात. मन्ना डे (हिंदी आणी बंगाली), हेमंत कुमार मुखोपाध्याय (बंगाली), एम.जी. श्रीकुमार (मल्याळम) आणी हरिहरन (हिंदी व मराठी) या गायकांना दोनदा हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रभागातील सर्वात अलीकडील पुरस्कार प्राप्तकर्ता अरिजीत सिंग आहेत ज्यांना तो २०१८ मध्ये पद्मावत चित्रपटाच्या "बिन्ते दिल" गाण्यासाठी मिळाला.[२]

मराठी गाण्यांसाठी चार गायकांना हा पुरस्कार मिळाला आहे: हरिहरन (गीत: "जीव दंगला गुंगला रंगला असा", चित्रपट: जोगवा, २००८), सुरेश वाडकर (गीत: "भास्करा क्षितीजावरी या" चित्रपट: मी सिंधुताई सपकाळ, २०१०), आनंद भाटे (बालगंधर्व चित्रपटाची सर्व गाणी, २०११) आणि महेश काळे (गीत:"अरूणी किरणी" चित्रपट: कट्यार काळजात घुसली, २०१५)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "15th National Film Awards" (PDF). International Film Festival of India. 21 September 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "66th National Film Awards".