Jump to content

बालमुरलीकृष्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एम. बालामुरलीकृष्ण या पानावरून पुनर्निर्देशित)
मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा

एम. बालामुरलीकृष्ण
आयुष्य
जन्म ६ जुलै १९३०
जन्म स्थान शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश
मृत्यू २२ नोव्हेंबर २०१६
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व तेलुगू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश
देश भारत
भाषा तेलुगू
संगीत साधना
गुरू श्री. पंतलु
गायन प्रकार कर्नाटक संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायक
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३८ - चालू
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९७१),
पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९९१),
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७५)

मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा (तेलुगू: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; रोमन लिपी: Mangalampalli Balamuralikrishna), अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, जुलै ६, इ.स. १९३०; - चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.

बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.

चित्रपटसृष्टीतील कामगिरी

[संपादन]

अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

जुगलबंदीचे कार्यक्रम

[संपादन]

कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरासिया, किशोरी अमोणकर आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत.

नवीन रागांची निर्मिती

[संपादन]

डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतात काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले.

बालमुरलीकृष्ण यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]