मॅन बुकर पुरस्कार
British literary award | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| याचे नावाने नामकरण |
| ||||
| स्थान |
| ||||
| मुख्यालयाचे स्थान | |||||
| विजेता |
| ||||
| स्थापना |
| ||||
| प्रायोजक |
| ||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
| |||||
मॅन बुकर पुरस्कार किंवा बुकर पुरस्कार हा इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे जी युनायटेड किंग्डम किंवा आयर्लंड येथे प्रकाशित झाली आहे. १९६९ मध्ये स्थापनेच्या वेळी हा फक्त राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना दिला जात असे; पण २०१४ पासून हा सर्व इंग्रजी कादंबऱ्यांना देण्यात येतो.[१][२] हे सर्वात प्रतिष्ठित साहित्यातील पुरस्कारांपैकी एक मानले जाते, आणि विजेत्याला £५०,००० दिले जाते, तसेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळते जी सामान्यतः कादंबरी व लेखकाच्या इतर कामांच्या विक्रीत लक्षणीय वाढ करते.
बुकर प्राइज फाउंडेशन दरवर्षी लेखक, प्रकाशक आणि पत्रकार तसेच राजकारणी, अभिनेता, कलाकार आणि संगीतकार असलेल्या पाच-सदस्यीय समितीची नेमणूक करते जी विजेत्या पुस्तकाची निवड करते.[३]
ही समिती आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, देखील देते जो अशा कादंबरींकरिता आहे ज्या इंग्रजीत भाषांतरित केलेल्या आहे आणि युनायटेड किंग्डम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झाल्या आहे. लघुकथा संकलने देखील आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी पात्र असतात. £५०,००० ची बक्षीस रक्कम विजेत्या पुस्तकाच्या लेखक आणि अनुवादकामध्ये समान प्रमाणात वाटली जाते.[४] तिसरा पुरस्कार, बाल साहित्याचा बुकर पुरस्कार, हा २०२५ मध्ये सुरू करण्यात आला, ज्याचा पहिला विजेता २०२७ मध्ये घोषित केला जाणार आहे.[५]
विजेते
[संपादन]- ↑ नंतर जाहीर केला गेला.
१९७१ मध्ये, या बक्षिसाचे नियम बदलण्यात आले व त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांना बक्षिस देण्याचे ठरले, मागच्या वर्षीच्या कादंबऱ्यांना नाही. परिणामी, १९७० मध्ये प्रकाशित झालेली कोणतीही कादंबरी बुकर पुरस्कार जिंकू शकत नव्हती. हा २०१० मध्ये "लॉस्ट मॅन बुकर पुरस्कार" जे.जी. फॅरेल यांच्या ट्रबल्स कादंबरीला देऊन दुरुस्ती केली गेली. - 1 2 3 विभागून देण्यात आला.
संदर्भ
[संपादन]- ↑ "'A surprise and a risk': Reaction to Booker Prize upheaval". BBC News. 18 September 2013. 19 September 2013 रोजी पाहिले.
- ↑ Sutherland, John (9 October 2008). "The Booker's Big Bang". New Statesman. 27 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ "The Booker Prize | The Booker Prizes". thebookerprizes.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-24 रोजी पाहिले.
- ↑ "The Booker Prizes". Booker Prize Foundation.
- ↑ Saunders, Emma (24 October 2025). "Booker Prize launches new award for children's fiction including young judges". BBC News.
- ↑ Allardice, Lisa (2023-11-27). "'This is a wake-up call': Booker winner Paul Lynch on his novel about a fascist Ireland". The Guardian (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. 2024-02-06 रोजी पाहिले.
Lynch, now 46,...
- ↑ Creamer, Ella (12 November 2024). "Samantha Harvey's 'beautiful and ambitious' Orbital wins Booker prize". The Guardian. 12 November 2024 रोजी पाहिले.
- ↑ "David Szalay: अंतर्मुखतेचा भाष्यकार". 6 जानेवारी 2026 रोजी पाहिले.