रंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रंगांचा वर्णपट (Spectrum)
विविध रंगांच्या पेन्सिली

रंग ही डोळ्यांना होणारी संवेदना आहे. प्रकाशाच्या (विद्युतचुंबकीय किरणोत्साराच्या) विविध तरंगलांबीमुळे रंग निर्माण होतात. गेरू, चिकणमाती, पिवळसर तांबूस माती, पानांचा रस हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत. [ संदर्भ हवा ] रंगामध्ये वर्णक (pigment) आणि रंजक (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे सेंद्रिय व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.

रंगांची यादी:

रंग विविध प्रकारचे असतात.

छटा[संपादन]

इंद्रधनुष्यातील रंग
तरंग लांबी वारंवारिता
तांबडा ~ ६२५–७४० नॅनो मीटर ~ ४८०–४०५ THz
नारिंगी ~ ५९०–६२५ नॅनो मीटर ~ ५१०–४८० THz
पिवळा ~ ५६५–५९० नॅनो मीटर ~ ५३०–५१० THz
हिरवा ~ ५००–५६५ नॅनो मीटर ~ ६००–५३० THz
पारवा ~ ४८५–५०० नॅनो मीटर ~ ६२०–६०० THz
निळा ~ ४४०–४८५ नॅनो मीटर ~ ६८०–६२० THz
जांभळा ~ ३८०–४४० नॅनो मीटर ~ ७९०–६८० THz

डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, गुलाबी, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, सरबती या तांबड्या रंगाच्या छटा;

जिलबी, लिंबू, सायी, हळदी, सोनचाफी, सोनेरी, केशरी, केतकी ह्या पिवळ्या रंगाच्या छटा.

लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा.

अस्मानी (आकाशी) आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. (निळ्या रंगाला "आनंदी' हा अगदी चपखल शब्द आहे.)

अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा.

काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा.

दुधिया, मोतिया आणि चंदेरी ह्या पांढर्‍या रंगाच्या छटा.

गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली हे मिश्ररंग. जांबुल हे सुद्धा जाम्बला रंग तैयार करण्यासाठी वापरतात

राखाडी, विटकरी, तपकिरी, घोडारंगी, मोरपिशी, मोरपंखी, चिंतामणी, लिंबू, पारवा, कुसुंबी, वांगी,

लाल, किरमिजी, तांबडा, शेंदरी, नारिंगी, अबोली, केशरी, कोनफळी, दुधी, मोतिया, सोनेरी,

रुपेरी, चंदेरी, जास्वंदी, राणी, करडा, भुरा, कबरा, पिवळा, निळा, बदामी,

गुलबाक्षी, जांभळा, हिरवा, शेवाळी, गुलाबी, मेंदी, चटणी, खाकी, भगवा, पिस्ता, अबिरी,

गव्हाळी, पांढरा, पिरोजी...वगैरे.

नैसर्गिक रंग त्वचे साठी अपायकारक नाहीत. गुलाबाच्या पाकळ्या पासून सुंदर गुलाबी रंग तयार करता येतो.