अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
ब्रीदवाक्य | अरबी: عَلَّمَ الاِنْسَانَ مَا لَمْ يَعْلَم |
---|---|
Endowment | $ १८.२ दशलक्ष |
President | प्रणव मुखर्जी, भारताचे राष्ट्रपती |
Campus | शहरी (४६७ हेक्टर) |
अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतामधील एक सरकारी अनुदानावर चालणारे खुले विद्यापीठ आहे. इ.स. १८७५ साली सय्यद अहमद खान ह्या शिक्षणतज्ञाने मोहमेडन ॲंग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. इ.स. १९२० साली त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले. ह्या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अलीगढ शहराजवळ ४६७ हेक्टर इतक्या क्षेत्रफळावर स्थित आहे.
प्रामुख्याने भारतामधील मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ह्या विद्यापीठामध्ये सध्या सर्व धर्माच्या व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश खुला आहे.
माजी विद्यार्थी[संपादन]
सरकारप्रमुख[संपादन]
- शेख अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री 1948-1953
- लियाकत अली खान, पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान 1947-1951
- मोहम्मद हमीद अन्सारी, भारताचे विद्यमान उप-राष्ट्रपती
- झाकिर हुसेन, भारताचे राष्ट्रपती 1967-1969
- अयुब खान, पाकिस्तानचा हुकुमशहा 1958-1969 (शिक्षण पूर्ण केले नाही)
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत