Jump to content

क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक
Автономна Республіка Крим (युक्रेनियन)
Автономная Республика Крым(रशियन)
क्राइमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताकचा ध्वज क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Процветание в единстве (रशियन)
एकात्मतेमध्ये उन्नती
राष्ट्रगीत: Нивы и горы твои волшебны, Родина (रशियन)
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताकचे स्थान
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताकचे स्थान
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सिंफेरोपोल
अधिकृत भाषा युक्रेनियन
इतर प्रमुख भाषा रशियन, क्राइमियन तातर
महत्त्वपूर्ण घटना
रशिया ध्वज रशिया देशाचे स्वायत्त प्रजासत्ताक रशियन साम्राज्य /
सोव्हिएत संघापासून
 
 - घोषणा १८ ऑक्टोबर १९२१ 
 - बरखास्ती ३० जून १९४५ 
 - पुन्हा स्वायत्तता १२ फेब्रुवारी १९९२ 
 - संविधान २१ ऑक्टोबर १९९८ 
क्षेत्रफळ
 - एकूण २६,१०० किमी (१४८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १९,७३,१८५ (१४८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७५.६/किमी²
राष्ट्रीय चलन युक्रेनियन रिउनिया
आंतरराष्ट्रीय कालविभाग मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


क्राइमिया (युक्रेनियन: Автономна Республіка Крим; रशियन: Автономная Республика Крым; क्राइमियन तातर: Qırım Muhtar Cumhuriyeti, Къырым Мухтар Джумхуриети) हा पूर्व युरोपातील एक वागद्रस्त भूभाग आहे. मार्च २०१४ सालापर्यंत युक्रेन देशाचे एक स्वायत्त प्रजासत्ताक असलेले क्राइमिया सध्या रशियाच्या अधिपत्याखाली आहे. क्राइमिया युक्रेनच्या दक्षिणेस व रशियाच्या नैऋत्येस काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर क्राइमिया ह्याच नावाच्या द्वीपकल्पावर वसले आहे.

क्राइमियाच्या इतिहासात अनेक महासत्तांचा समावेश आहे. १५व्या ते १८व्या शतकादरम्यान हा भूभाग ओस्मानी साम्राज्याच्या तर १८व्या ते विसाव्या शतकादरम्यान रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने हा प्रदेश बळकावला व युद्धानंतर सोव्हिएत संघाच्या राजवटीदरम्यान क्राइमिया आधी सोव्हिएत रशिया व नंतर सोव्हिएत युक्रेनचा राजकीय विभाग होता.

२६,१०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या क्राइमिया प्रजासत्ताकाची लोकसंख्या २००७ साली सुमारे २० लाख इतकी होती. सिंफेरोपोल ही क्राइमियाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर सेव्हास्तोपोल, याल्ताकर्च ही इतर मोठी शहरे आहेत. पर्यटन व शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: