अंगणवाडी

अंगणवाडी ही भारतातील ग्रामीण भागात चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. देशभरात एकूण १३.७७ लाख अंगणवाडी केंद्रे आहेत,[१] तर महाराष्ट्रात १,०८,००५ अंगणवाडी कार्यरत आहेत.[२] यामध्ये १२.८ लाख अंगणवाडी सेविका आणि ११.६ लाख अंगणवाडी मदतनीस काम करतात.[३]
प्रतिक्षा बाबासाहेब थोरात
[संपादन]ग्रामीण भागात अंगणात चालणारी माहिती आणि सेवा केंद्र म्हणजे अंगणवाडी. ही एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्थानिक अंगणवाडी ही ICDS चा आधार आहे. या केंद्रांद्वारे महिला आणि बालक यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सेवा दिल्या जातात. यात ३ ते ६ वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आणि कुपोषण याकडे लक्ष देणे यांचा समावेश आहे. तसेच पालकांना मार्गदर्शन करणे आणि ग्रामीण महिलांना आरोग्य व आहाराबाबत जागरूक करणे हेही अंगणवाडीचे मुख्य काम आहे.[४] अंगणवाडी केंद्रे लोकसंख्येच्या निकषांवर आधारित स्थापन केली जातात. ही केंद्रे अंगणवाडी सेविका चालवतात आणि त्यांना मदतनीस सहाय्य करतात.
भारतातील अंगणवाडी शिक्षणाची पार्श्वभूमी
[संपादन]भारतात अंगणवाडी शिक्षणाची सुरुवात १९व्या शतकात झाली. त्या काळात लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाइसरॉय होता. त्याच्या काळात किंडरगार्टन पद्धती देशात आली. त्याचा प्रभाव आजही प्राथमिक शिक्षणात दिसतो. १८८७ पासून शिशु शिक्षणाची व्यवस्था सुरू झाली. तेव्हा ५ वर्षांवरील मुलांना शाळेत प्रवेश मिळत असे, पण ४ वर्षांची मुलेही येत असल्याने त्यांच्यासाठी बालोद्यान पद्धतीने शिकवण्यास सुरुवात झाली. या वर्गात गाणी, गोष्टी आणि खेळ यांना महत्त्व दिले गेले. १८९४ मध्ये मॉन्टेसरी पद्धतीची पहिली शाळा मद्रासजवळ अडयार येथे सुरू झाली. या पद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांनी खूप प्रयत्न केले. १८९६ मध्ये मुंबई राज्यात बडोदा जिल्ह्यातील वासते गावात मॉन्टेसरी शाळा सुरू झाली. १९२५ मध्ये भावनगर येथे पहिली मॉन्टेसरी परिषद झाली आणि त्याच वर्षी गिजुभाई व ताराबाई यांनी नूतन बालशिक्षण संघ स्थापन केला.[५] या संस्थेमुळे गावोगावी बालमंदिर आणि शिशुसदन सुरू झाले.
महाराष्ट्रातील अंगणवाडी शिक्षणाची पार्श्वभूमी
[संपादन]महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सुरुवात २ ऑक्टोबर १९७५ रोजी झाली. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि मुंबईतील धारावी या दोन ठिकाणी ही योजना सुरू झाली. बालकांचे पोषण, आरोग्य, कुपोषण कमी करणे आणि बालमृत्यू टाळणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. आज या योजनेचा विस्तार झाला आहे.
राज्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प
[संपादन]प्रकल्प
[संपादन]- नागरी प्रकल्प: १०४
- ग्रामीण/आदिवासी प्रकल्प: ४४९[६]
मंजूर अंगणवाडी केंद्रे
[संपादन]- अंगणवाडी केंद्रे: ९७,४७५
- मिनी अंगणवाडी केंद्रे: १३,०११
अंगणवाडीच्या सेवा
[संपादन]अंगणवाडीत खालील सहा सेवा दिल्या जातात:
- पूरक पोषण आहार
- लसीकरण
- आरोग्य तपासणी
- संदर्भ सेवा
- अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण
- आरोग्य आणि आहार शिक्षण
नागरी
[संपादन]- प्रकल्प स्तर: बाल विकास प्रकल्प अधिकारी
- बीट स्तर: मुख्यसेविका
- अंगणवाडी केंद्र: अंगणवाडी सेविका व मदतनीस
संदर्भ
[संपादन]- ^ "Government plans to upgrade 2.5 lakh anganwadi centres in next 5 years: Women and Child Development Ministry official". economictimes.indiatimes.com (English भाषेत). 17 December 2019. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "अंगणवाडीची कार्ये". womenchild.maharashtra.gov.in (Marathi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "लॉकडाऊनमुळे अंगणवाडीसेविका आर्थिक संकटात". marathi.thewire.in (Marathi भाषेत). 24 April 2020. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस)". loksatta.com (Marathi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "गिजू भाई बधेका का शैक्षिक चिन्तन एवं आधुनिक भारतीय बाल" (PDF). gijubhaibadheka.in (Hindi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "राज्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प" (PDF). 9 November 2022 रोजी पाहिले.