रोगप्रतिकारशक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोग जंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात म्हणून एच आय व्ही बाधित व्यक्ती लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती मर्यादेपेक्षा वाढल्यास त्रासदायक ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने निर्माण होणाऱ्या आजारांना ऑटो इमुउन डीसीजेस अशी व्याख्या आहे. आमवात, (सांधेदुखी / rhumatoid arthritis) हा एक ऑटो इमुउन डीसीज / रोग आहे रोगप्रतिकारक शक्ती आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करून वाढवता येते. सकस आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.[१] धूम्रपान आणि मद्यपान यामुळे रोगप्रतिकारशक्ति कमी होते आणि शारीरिक व्यायामामुळे वाढते.

जर आपण रोग प्रतिकार शक्ति वाढवू इच्छिता तर आपणास नियमित व्यायाम व योग करणे, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, पुरेशी झोप, चिंता मुक्त जीवन इत्यादी गोष्टींचा समावेश दैनंदिन जीवनात करावा लागेल.

  1. ^ "लॉकडाउनमध्ये 'या' दहा सोप्या पद्धतीने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती". Loksatta. 2020-05-22. 2020-05-27 रोजी पाहिले.