कपिलधार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे.तिथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमीवर मांजरसुंभा, व तेथून दीड किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे.जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. मांजरसुभा हे गाव बीड तालुक्यात आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कपिलधार". १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)