किल्ले धारूर
Jump to navigation
Jump to search
बालाघाटाच्या रांगामध्ये वसलेला किल्ले धारूर हा बीड जिल्ह्यातला महत्त्वाचा तालुका आहे. किल्ले धारूर बाजारपेठ येथील सोन्याची बाजार पेठ फार पुर्वीपासुन प्रसिद्द आहे. तसेच सीताफळे व खव्याच्या निर्यातीत किल्ले धारूर अग्रेसर आहे. किल्ले धारुर येथील सराफा बाजारपेठ फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. सीताफळांसाठी धारुरचे नाव प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्यालासुद्धा येथील सीताफळांना मागणी असते. तसेच खवा उत्पादन ही येथे बऱ्याच प्रमाणात होत असते. सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी येथे आठवडी बाजार भरतो. तालुक्यातील शेतकरी भाजी-पाला, खवा, धान्य आणून येथे बाजार भरवतात. शेतमालासाठी येथे कृषी-उत्पन्न बाजार समिती असून ती शेतकऱ्यांना सेवा पुरवते.
किल्ले धारूर च्या उपग्रह छायाचित्रां साठी येथे टिचकी मारा.