शिरूर तालुका, बीड जिल्हा
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
?शिरूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: कासार | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | बीड |
कोड • पिन कोड |
• ४१३२४९ |
शिरूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
शिरुर तालुक्यात अनेक छोटे मोठे गावे आहेत.काही गावाची नावे:बावी,येळंब रायमोहा ,वंजारवाडी,तागडगाव,पाडळी,शिरुर तालुक्या अती रम्य परिसर आहेत. संत भगवानबाबा यांचे समाधीस्थळ असलेले भगवानगड हे पवित्र तीर्थक्षेत्र शिरूरहून 18 किमी. आहे. आहे. शिरुर तालुक्यातील वंजारवाडी येथुन जवळच असलेल्या येवलवाडी या ठिकाणी नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक असलेले श्री. कानिफनाथ यांचे गुरू श्री. जालिंदरनाथ यांची समाधी आहे.
शिरुर का. पासून 9 कि.मि.अंतरावर सावरगांव चकला हे उंच टेकडीवर वसलेल गाव. या गावात बंकटस्वामीचे शिष्य वै.ह.भ.प. गणपतभाऊ महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर आहे. शिरूर हे तालुक्याचे ठिकाण असून हे सिंदफना नदीच्या काठी वसलेले आहे. येथे हेमाडपंथी स्वरूपाचे प्राचीन सिद्धेश्वराचे मंदीर आहे. शिरूरपासून 10 किमी. अंतरावर पाडळी हे गांव उथळा नदीजवळ वसलेले आहे. तागडगांव येथे छोटासा जलाशय असून याद्वारे शिरूरला पाणीपुरवठा होतो. कालीका देवीचे मंदीर ही या ठिकाणी आहे.
वृत्तपत्रे: 'राष्ट्रनिर्माण' हे साप्ताहिक शिरूर कासार येथून प्रसिद्ध होते. त्याचे संपादक युवराज सोनवणे हे आहेत.