औसेकर मठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औसा या गावामध्ये औसेकर मठ आहे. या मठालाच 'नाथसंस्थान' म्हणतात. हा मठ १७व्या शतकातील असून मठाधिपतींची गुरुपरंपरा आदिनाथ - मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तिनाथ - ज्ञानेश्वर महाराज - देवनाथ चूडामणी - गुंडानाथ महाराज - वीरनाथ महाराज - मल्लनाथ महाराज - दासवीरनाथ महाराज - ज्ञानेश्वर महाराज (परत?) - गुरूबाबा महाराज अशी आहे. संदर्भ :'श्री गुरूवीर लीलामृत / अभंग १०'. वीरनाथ महाराज हे पहिले मठाधिपती असून त्यांनी गुंडामहाराज देगलुरकर यांच्याकडुन दिक्षा घेतली. पिता मल्लप्पा व माता शिवम्मा उर्फ महादाबाई ह्यांच्या उदरी झाला. वीरनाथ महाराज इ.स. १८५५ मध्ये वैकुंठवासी झाले. मल्लनाथ महाराज यांचा जन्म इ.स.१८४५ मध्ये औसा येथे झाला व इ.स.१९१४ मध्ये वैकुंठवासी झाले. वडील वीरनाथ व आई रूक्माबाई. वीरनाथ महाराज यांनी इ.स.१८४५ मध्ये विठ्ठल मंदिर बांधण्यास सुरुवात केली. मंदिराच्या शेजारीच मठ असून तेथे भक्तांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे. श्रावण महिन्यात नियमित भजन, चक्रीभजन, कीर्तन, पारायण सुरू असते.

मठामध्ये वर्षातून एकदा नाथषष्ठी उत्सव साजरा होतो. या उत्सवाला २२०हून अधिक वर्षाची परंपरा आहे. हा उत्सव तुकाराम बीजेपासून सुरू होतो.

संदर्भ[संपादन]

  • 'मल्लनाथ महाराजकृत साहित्य', संगीता व्यंकटराव मोरे, मैत्री प्रकाशन, लातूर, प्रथमावृत्ती २००५, पृ. १६.