एम. चन्ना रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मारी चन्ना रेड्डी (१९१९-१९९६) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते १९७८ ते १९८० आणि १९८९ ते १९९० या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.तसेच ते १९८२ ते १९८३ या काळात पंजाबचे, १९९२ ते १९९३ या काळात राजस्थानचे आणि १९९३ ते १९९६ या काळात तमिळनाडूचे राज्यपाल होते.