दग्गुबाती पुरंदेश्वरी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल २२, इ.स. १९५९ चेन्नई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वडील | |||
भावंडे |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
दग्गुबाती नंदामुरी पुरंदरेश्वरी (जन्म २२ एप्रिल १९५९) ह्या आंध्र प्रदेश राज्यातील एक भारतीय राजकारणी आहे. भारताच्या १५व्या लोकसभेत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.[१] त्यांनी यापूर्वी १४व्या लोकसभेत बापटला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते व त्या काळात त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केले होते. [२] त्यांनी ७ मार्च २०१४ रोजी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला [३] २०१४ मध्ये त्यांनी राजमपेटमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. [४] पुरंदरेश्वरी यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. [५] [६]
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]अभिनेता-राजकारणी एन.टी. रामाराव आणि बसवतारकम यांच्या पोटी पुरंदेश्वरी यांचा जन्म २२ एप्रिल १९५९ ला झाला. त्यांनी आठ भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यांनी शालेय शिक्षण सेक्रेड हार्ट मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल, चर्च पार्क, चेन्नई येथून केले. पुढे साउथ इंडियन एज्युकेशनल ट्रस्ट अँड वुमन कॉलेज ( चेन्नई ) (सद्याचे नाव बशीर अहमद सईद कॉलेज फॉर वुमन) मधून कला शाखेची पदवी घेतली त्यांनी घेतली व त्यानंतर तिने जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये रत्नशास्त्राचा एक छोटा अभ्यासक्रम केला आहे.[७] नंतर त्यांनी हैदराबाद इन्स्टिट्यूट ऑफ जेम अँड ज्वेलरी स्थापन केली. त्यांना इंग्रजी, तेलगू, तमिळ, हिंदी आणि फ्रेंच या भाषा येतात व कुचिपुडी नृत्य प्रकारात त्या पारंगत आहे.
कारकीर्द
[संपादन]खासदार म्हणुन पुरंदेश्वरी यांनी घरगुती हिंसाचार विधेयक, हिंदू उत्तराधिकार सुधारणा विधेयक, आणि महिलांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याबाबतचे विधेयक, यासारख्या विविध विधेयकांवरील चर्चेत भाग घेऊन अर्थपूर्ण योगदान दिले. संसदेतील त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी, एशियन एजने त्यांना २००४-०५ साठी सर्वोत्तम सांसद म्हणून घोषित केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Southern Sushma Swaraj Sets the Pace". 2016-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-20 रोजी पाहिले.
- ^ New railway zone now a political decision, says Purandeswari. Retrieved from The Hindu 12/25/2013. (article dated "Updated: December 25, 2013 13:32 IST")
- ^ "NTR's daughter D Purandareswari joins BJP". NDTV. 7 March 2014.
- ^ "Former Union Minister Daggubati Purandeswari to head AP BJP's manifesto Committee". www.newsbharati.com.
- ^ "BJP creates OBC morcha ahead of Bihar election".
- ^ "With an eye on Bihar, UP polls, BJP forms OBC Morcha to boost electoral fortunes".
- ^ ‘Hinduism to me is a way of life’ Indian Express- 11 January 2009