इ.स. २००५
Appearance
(इ. स. २००५ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | २००२ - २००३ - २००४ - २००५ - २००६ - २००७ - २००८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी १६ - ६६ वर्षांच्या एड्रियाना ईलेस्कुने मुलीला जन्म दिला व आत्तापर्यंतची सर्वात जास्त वयाची माता ठरली.
- जानेवारी २६ - ग्लेन्डेल, कॅलिफोर्नियात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. ११ ठार, २०० जखमी.
- जानेवारी २६ - इराकच्या पूर्व भागात अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळले. ३१ सैनिक ठार.
- जानेवारी ३० - इ.स. १९५३नंतर इराकमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.
- फेब्रुवारी १४ - लेबेनॉनच्या भूतपूर्व पंतप्रधान रफिक हरिरिचा हत्या.
- मार्च ७ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने.
- एप्रिल १९ - जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.
- एप्रिल २५ - जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.
- एप्रिल २६ - २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.
- एप्रिल २७ - एरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.
- मे ५ - युनायटेड किंग्डममध्ये निवडणुकी. टोनी ब्लेरच्या पक्षास पुन्हा बहुमत.
- मे १६ - कुवैतमध्ये स्त्रीयांना प्रथमच मतदानाचा हक्क.
- मे ३१ - वॉटरगेट कुभांड - डब्ल्यु. मार्क फेल्टने आपणच डीप थ्रोट नावाने ओळखला जाणारा गुप्त बातमीदार असल्याचे कबूल केले.
- जून २८ - कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा.
- जून ३० - स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मुभा.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै ७ - दहशतवाद्यांनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.
- जुलै १२ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.
- जुलै १३ - पाकिस्तानच्या घोट्की रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
- जुलै २० - चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार.
- जुलै २४ - लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.
- जुलै २६ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
- ऑगस्ट २ - एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरून घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.
- ऑगस्ट ३ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.
- सप्टेंबर २४ - हरिकेन रिटा हे चक्रीवादळ अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या बोमॉॅंट शहराजवळ समुद्रातून किनाऱ्यावर आले. या वादळाने बोमॉॅंट शहर व जवळ असलेल्या नैऋत्य लुईझियानामध्ये अतोनात नुकसान केले.
- २००५ - वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.
- डिसेंबर २९ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- जानेवारी ३ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी.
- जानेवारी १६ - श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती.
- जानेवारी १७ - झाओ झियांग, चीनचा अध्यक्ष.
- फेब्रुवारी ३ - झुराब झ्वानिया, जॉर्जियाचा पंतप्रधान.
- फेब्रुवारी १४ - रफिक हरिरि, लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी २० - हंटर एस. थॉम्पसन, अमेरिकन पत्रकार, लेखक.
- एप्रिल २४ - एझेर वाइझमन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- एप्रिल २५ - स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.
- मे २ - वी किम वी, सिंगापूरचा राष्ट्राध्यक्ष.
- मे २५ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
- जून ६ - ऍन बॅन्क्रॉफ्ट, अमेरिकन अभिनेत्री.
- जुलै १० - जयवंत कुलकर्णी (प्रसिद्ध मराठी गायक)
- जुलै १७ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १ - फह्द, सौदी अरेबियाचा राजा.
- नोव्हेंबर १२ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.
- डिसेंबर १३ -रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.
- डिसेंबर २७ -केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा बहुचर्चित क्रिकेट प्रायोजक व उद्यागपती.