Jump to content

भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडिया (राजकीय आघाडी) या पानावरून पुनर्निर्देशित)
Alianza Inclusiva de Desarrollo Nacional de India (es); ভারতীয় জাতীয় উন্নয়নশীল সমন্বিত জোট (bn); Alliance inclusive de la nation indienne pour le développement (fr); Aliança Inclusiva de Desenvolupament National de la India (ca); भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (mr); Aliança Nacional Indiana para o Desenvolvimento Inclusivo (pt); Indian National Developmental Inclusive Alliance (en-gb); Indian National Developmental Inclusive Alliance (af); 印度國家發展包容性聯盟 (zh); ভাৰতীয় ৰাষ্ট্ৰীয় বিকাশমূলক অন্তৰ্ভুক্ত মিত্ৰতা (as); انڈین نیشنل ڈیولپمنٹ انکلوسیو الائنس (ur); भारतीय राष्ट्रीय विकासशील समावेशी गठबंधन (bho); ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂತರ್ಗತ ಮೈತ್ರಿ (kn); Aliansi Nasional Pembangunan Inklusif India (id); ਭਾਰਤੀ ਰਾਸ਼ਟਰੀ ਵਿਕਾਸ ਸੰਮਲਿਤ ਗੱਠਜੋੜ (pa); ഇന്ത്യൻ നാഷണൽ ഡവലപ്പ്മെൻ്റൽ ഇൻക്ലൂസീവ് അലയൻസ് (ml); Hindistan Milli İnkişaf üzrə İnklüziv Alyans (az); भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेता सङ्घः (sa); भारतीय राष्ट्रीय विकासशील समावेशी गठबंधन (hi); ఇండియా కూటమి (te); 인도 국가개발 포괄동맹 (ko); Indian National Developmental Inclusive Alliance (en); التحالف الوطني الهندي التنموي الشامل (ar); インド国家開発包括同盟 (ja); இந்திய தேசிய வளர்ச்சியை உள்ளடக்கிய கூட்டணி (ta) coalición opositora de la India fundada en 2023 (es); インドの政党連合 (ja); coalition politique d'opposition en Inde, formée en 2023 (fr); ভারতীয় জাতীয় কংগ্রেসের নেতৃত্বে বিরোধী দলের বিগ-টেন্ট জোট (bn); ভাৰতীয় জাতীয় কংগ্ৰেছৰ নেতৃত্বত ভাৰতৰ বিৰোধী দলসমূহৰ ডাঙৰ তম্বু মিত্ৰজোঁট (as); भारतीयराष्ट्रीयकाङ्ग्रेसस्य नेतृत्वे भारते विपक्षदलानां बृहत् तम्बूसङ्घटनम् (sa); Big-tent coalition of Opposition parties led by INC in India (en-gb); आघाडी (mr); coalició opositora de l'Índia fundada el 2023 (ca); 2023 में बना भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के नेतृत्व वाला बड़ा विपक्षी गठबंधन (hi); భారత జాతీయ కాంగ్రెస్ నేతృత్వంలో 2023లో స్థాపించబడిన పెద్ద-గుడార ప్రతిపక్ష కూటమి (te); ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೃತ್ವದ ದೊಡ್ಡ ಟೆಂಟ್ ವಿರೋಧ ಒಕ್ಕೂಟ (kn); big-tent opposition coalition led by the Indian National Congress founded in 2023 (en); التحالف الهندي المعارض (ar); भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अगुआई में बिपक्ष के पार्टी सभ के बिग-टेंट गठबंधन (bho); இந்தியாவில் இந்திய தேசிய காங்கிரஸ் தலைமையிலான எதிர்க்கட்சிகளின் பெரிய கூடாரக் கூட்டணி (ta) INDIA, I.N.D.I.A (es); ইন্ডিয়া (bn); Indian National Developmental Inclusive Alliance, I.N.D.I.A, INDIA, Alliance Inclusive de la Nation Indienne pour le Développement (fr); INDIA, I.N.D.I.A (ca); इंडिया, इंडिया गठबंधन (hi); భారత జాతీయ అభివృద్ధి సమ్మిళిత కూటమి, ఇండియన్ నేషనల్ డెవలప్‌మెంటల్ ఇన్‌క్లూజివ్ అలయన్స్, I.N.D.I.A. (te); I.N.D.I.A., INDIA Alliance (en); इंडिया, आई.एन.डी.आई.ए. (bho); இ.தே.வ.உ.கூ. (ta)
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी 
आघाडी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारpolitical coalition,
राजकीय युती
स्थान भारत
स्थापना
  • जुलै १८, इ.स. २०२३
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंग्रजी मध्ये: Indian National Developmental Inclusive Alliance I.N.D.I.A) किंवा इंडिया (ब्लॉक) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील २७ भारतीय राजकीय पक्षांची एक मोठी राजकीय आघाडी आहे.[] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पाडणे हे ह्या युतीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.[]

काही स्त्रोतांनी ह्या आघाडीच्या नावाच्या सूचनेचे श्रेय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांना दिले आहे, [] तर इतरांनी असे नमूद केले आहे की ते तृणमूल काँग्रेसच्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुचवले होते.[]

इतिहास

[संपादन]

पहिली बैठक: पाटणा, बिहार: एकतेसाठी समन्वय

[संपादन]

पाटणा, बिहार येथे २३ जून २०२३ रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली, जेव्हा नवीन युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या बैठकीला १६ विरोधी पक्ष उपस्थित होते. []

दुसरी बैठक: बेंगळुरू, कर्नाटक: औपचारिक स्थापना

[संपादन]

बंगळूर, कर्नाटक येथे झालेल्या दुसऱ्या विरोधी पक्षांची बैठक यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, जेव्हा युतीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि यादीत आणखी १० पक्ष जोडले गेले. युतीचे नाव निश्चित करण्यात आले आणि त्याला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असे नाव देण्यात आले.[]

तिसरी बैठक: मुंबई, महाराष्ट्र: प्राथमिक योजना

[संपादन]

३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२३ दरम्यान मुंबईत विरोधी पक्षांची तिसरी बैठक झाली. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते आणि सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ५ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दोन दिवसांच्या चर्चेमध्ये, युतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर चर्चा केली, समन्वय समिती तयार केली आणि २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका 'शक्यतोपर्यंत' एकत्र लढण्यासाठी तीन कलमी ठराव मंजूर केला. [] []

सदस्य पक्ष

[संपादन]

युतीचे ४० सदस्य पक्ष आहेत: [][१०]

पक्ष नेता चिन्ह / झेंडा लोकसभा राज्यसभा मूळ
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मल्लिकार्जुन खरगे
१०२ / ५४३
३१ / २४५
राष्ट्रीय पक्ष
द्रविड मुन्नेत्र कळघम
एम.के. स्टॅलिन
२२ / ५४३
१० / २४५
पुडुचेरी, तमिळनाडू
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
ममता बॅनर्जी
२९ / ५४३
१३ / २४५
पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
उद्धव ठाकरे
९ / ५४३
३ / २४५
महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
शरद पवार
८ / ५४३
३ / २४५
महाराष्ट्र
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
सीताराम येचुरी
४ / ५४३
५ / २४५
राष्ट्रीय पक्ष
समाजवादी पक्ष
अखिलेश यादव
३७ / ५४३
३ / २४५
उत्तर प्रदेश
इंडियन युनियन मुस्लिम लीग
के.एम. कादर मोहिद्दीन
३ / ५४३
१ / २४५
केरळ
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
फारुख अब्दुल्ला
२ / ५४३
 – जम्मू आणि काश्मीर
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
दोराईसामी राजा
२ / ५४३
२ / २४५
केरळ, तमिळनाडू, मणिपूर
आम आदमी पक्ष
अरविंद केजरीवाल
३ / ५४३
१० / २४५
राष्ट्रीय पक्ष
झारखंड मुक्ति मोर्चा

हेमंत सोरेन
३ / ५४३
२ / २४५
झारखंड
केरळ काँग्रेस (मणी)
जोस के. मणी
१ / ५४३
१ / २४५
केरळ
विदुतलै चिरुतैगल कच्ची
थोल. थिरुमावलवन
१ / ५४३
 – तमिळनाडू
क्रांतिकारी समाजवादी पक्ष मनोज भट्टाचार्य
१ / ५४३
 – केरळ
राष्ट्रीय जनता दल
लालू प्रसाद यादव
 –
६ / २४५
बिहार, झारखंड
मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम
वैको
१ / २४५
तमिळनाडू
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन
दिपंकर भट्टाचार्य
 – बिहार
केरळ काँग्रेस
पी. जे. जोसेफ
केरळ
अपना दल (कमेरावादी)
कृष्णा पटेल
उत्तर प्रदेश
फॉरवर्ड ब्लॉक जी. देवराजन पश्चिम बंगाल
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
मेहबूबा मुफ्ती
जम्मू आणि काश्मीर
मनिथनेय मक्क्ल कच्ची एम.एच. जवाहिरुल्ला तमिळनाडू
कोंगुनाडू मक्कल देसिया कच्ची
इ.आर. इश्वरन
तमिळनाडू
शेतकरी कामगार पक्ष जयंत प्रभाकर पाटील
महाराष्ट्र
इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स
२३७ / ५४३
९३ / २४५
-

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Opposition names alliance INDIA in run-up to 2024 elections". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 20 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 July 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Hrishikesh, Cherylann Mollan & Sharanya (18 July 2023). "Opposition meeting: 26 Indian parties form alliance to take on PM Modi". BBC News. 20 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Nair, Sobhana K. (18 July 2023). "Picking the name INDIA for alliance, Opposition parties frame 2024 battle as BJP vs the country". The Hindu. 21 July 2023 रोजी पाहिले.
  4. ^ Ghosh, Poulomi (19 July 2023). "'Who gave INDIA name? Who can't arrive at consensus…': BJP's dig 10 points". Hindustan Times. 21 July 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Tenets of unity: On the Opposition meet in Patna". The Hindu. 25 June 2023.
  6. ^ "Opposition alliance named 'INDIA', 11-member coordination committee to decide on all important issues". The Times of India. 2023-07-19. ISSN 0971-8257. 19 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-07-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Live Updates: INDIA bloc forms 14-member coordination panel, says seat-sharing formula for 2024 Lok Sabha polls soon". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 1 September 2023.
  8. ^ "I.N.D.I.A Opposition bloc 2-day meet ends, resolution adopted, coordination committee formed". IndiaTV (इंग्रजी भाषेत). 1 September 2023.
  9. ^ "The 26 Opposition Parties That Have Formed Mega Alliance for 2024 Polls".
  10. ^ "The 26 Opposition Parties That Have Formed Mega Alliance For 2024 Polls". NDTV. 22 February 2019. 20 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.