शुंग साम्राज्य
शुंग साम्राज्य | |
---|---|
| |
इ.स.पू. १८५ - इ.स.पू. ७३ | |
राजधानी | पाटलीपुत्र |
राजे |
पुष्यमित्र शुंग अग्निमित्र भागभद्र |
भाषा |
संस्कृत पाली |
क्षेत्रफळ | १२ लक्ष वर्ग किमी |
|
|
शुंग घराणे (इ.स.पू. १८५ ते इ.स.पू. ७३) याची स्थापना पुष्यमित्र याने इ.स.पू. १८५ मध्ये केली. या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेले. त्यांनी एकूण ११० वर्षे मगधावर सत्ता गाजवली.
इतिहास
[संपादन]शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता. त्यावेळी मौर्य साम्राज्य दुर्बल झाले होते. या साम्राज्यातून कलिंग देश स्वतंत्र झाला होता. तशातच पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळविले व शुंग घराण्याची स्थापना केली.
राज्यकर्ते
[संपादन]- पुष्यमित्र शुंग (इ.स.पू. १८५ ते इ.स.पू. १४९)
- अग्निमित्र (इ.स.पू. १४९ ते इ.स.पू. १४१)
- वसुजेष्ठ (इ.स.पू. १४१ ते इ.स.पू. १३१)
- वसुमित्र शुंग (इ.स.पू. १३१ ते इ.स.पू. १२४)
- आंध्रक (इ.स.पू. १२४ ते इ.स.पू. १२२)
- पुलिंदक (इ.स.पू. १२२ ते इ.स.पू. ११९)
- घोष (?)
- वज्रमित्र (?)
- भागभद्र (?)
- देवभूती (इ.स.पू. ८३ ते इ.स.पू. ७३)
कामगिरी
[संपादन]पुष्यमित्राने छत्तीस वर्षे मगधावर राज्य केले. पुष्यमित्राची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. इ.स.पू. १७५च्या सुमारास मिनँडर या ग्रीक राजाने हिंदुस्थानवर स्वारी केली होती. सिंध, काठेवाड व पश्चिम किनाऱ्यावरील काही भाग त्याने जिंकला. मथुरा नगरी जिंकून तो पाटलीपुत्रावर चाल करून आला त्यावेळी पुष्यमित्राने त्याच्याशी लढाई करून त्याला हिंदुस्थानाबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र याने विदर्भावर स्वारी करून तो प्रांत शुंग घराण्याच्या अमलाखाली आणला. अग्निमित्रानंतर शुंग घराण्यातील महत्त्वाचा राजा म्हणजे भागभद्र होय. भागभद्रानंतर आलेला देवभूती यानेही काही फारसी चांगली कामगिरी केली नाही.
शेवट
[संपादन]देवभूतीच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधान होता. कण्व घराण्यातील या वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट होऊन मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली.