मराठी विश्वकोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर ऑनलाइन व मोफत वाचता येतो.[१]

मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडाचा पूर्वार्ध जानेवारी २०१५मध्ये आणि उत्तरार्ध जून २००१५मध्ये प्रकाशित करण्यात आला.[२] मूळ २० छापील खंडांचे डिजिटायझेशन करून ते क्रमाक्रमाने आंतरजालावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम २५ ऑक्टोबर २०११ पासून सुरू झाला. प्रकाशित झालेले २० खंड आंतरजालावर सीडॅकच्या सहकार्याने आले आहेत. मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयाचे ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो .

पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने पुण्यातील ‘सी-डॅक जिस्ट’च्या सहकार्याने निर्माण केलेल्या ‘मराठी विश्वकोश डॉट इन’ या संकेतस्थळला ई-गव्हर्नन्सचा ‘प्लॅटिनम ॲवॉर्ड’ मिळालेला आहे.[३]

मराठी विश्वकोशाची विषयव्याप्ती[संपादन]

मराठी विश्वकोशात सुमारे शंभर विषयांवरील विविध नोंदींचा समावेश आहे.

मानव्यविद्या[संपादन]

पहा मुख्य लेख : मानव्यविद्या

विज्ञान व तंत्रविद्या[संपादन]

घटक खंडांचे विवरण[संपादन]

मराठी विश्वकोश खंडपरिचय
खंड क्र. पहिली नोंद अखेरची नोंद पृष्ठे† प्रकाशन
०१ अंक आतुर चिकित्सा ९४४ १९७६
०२ आतुर निदान एप्स्टाइन, जेकब १०४२ १९७६
०३ एबिंगहाऊस, हेरमान किसांगानी ९६५ १९७६
०४ कीकट गाल्फिमिया ग्लॉका ९९७ १९७६
०५ गाल्वा, एव्हारीस्त चेदि १०२२ १९७६
०६ चेन, सर एर्न्स्ट बोरिस डोळा १०८३ १९७७
०७ ड्यूइसबुर्क धरणगाव १०७८ १९७७
०८ धरणे व बंधारे न्वाकशॉट ११११ -
०९ पउमचरिउ पेहलवी साहित्य ११४३ -
१० पैकारा बंदरे १२५३ -
११ बंदा ब्वेनस एअरीझ १११२ -
१२ भंगुरतारा महाराष्ट्र राज्य १५८६ -
१३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ (मेल्ट्रॉन) म्हैसूर संस्थान १३२८ -
१४ यंग, एडवर्ड रेयून्यों बेट १३०७ -
१५ रेल्वे वाद्य व वाद्यवर्गीकरण १३९६ -
१६ वाद्यवृंद विज्ञानशिक्षण ९९९ -
१७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान शेक्सपिअर, विल्यम ८९३ फेब्रुवारी २००७
१८ शेख अमर सह्याद्रि ८७७ ऑगस्ट २००९
१९ सॅंगर, फ्रेडरिक सृष्टि व मानव - संकेतस्थळावर उपलब्ध
२० पूर्वार्ध सेई शोनागुन हर्षचरित ७५४ जानेवारी २०१५
२० उत्तरार्ध हर्षवर्धन समाट झेयवाद ७५५-१३३६ जून २०१५
२१ परिभाषा-संग्रह - - आगामी
२२ मानचित्रसंग्रह - - आगामी
२३ सूची - - आगामी

† केवळ नोंदींच्या मजकुराच्या पृष्ठांचाच समावेश. आरंभीच्या पृष्ठांचा आणि प्रत्येक खंडाच्या अखेरीस असलेल्या चित्रपत्रांचा समावेश नाही.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ https://vishwakosh.marathi.gov.in/
  2. ^ "मराठी विश्वकोश इतिहास". मराठी विश्वकोश. 2019-11-06 रोजी पाहिले.
  3. ^ म.टा. प्रतिनिधी (७ सप्टेंबर २०१३). "विश्वकोशाच्या वेबसाइटला 'प्लॅटिनम ॲवॉर्ड'". महाराष्ट्र टाईम्स. मुंबई. ११ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]