Jump to content

मानव्यविद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रामुख्याने चिकित्सक व अटकळीच्या स्वरूपात असलेल्या पद्धतींचा वापर करून मानवी परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखांना मानव्यविद्या असे म्हटले जाते.

मानव्यविद्यांमध्ये प्राचीन व आधुनिक भाषा, साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्म यासोबतच संगीत व रंगभूमी अशा दर्शनात्म व आविष्कारात्म कलांचा समावेश होतो. इतिहास, मानववंशशास्त्र, क्षेत्र अभ्यास, संवाद अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास, विधी व भाषाशास्त्र या सामाजिक शास्त्रांचा समावेशही मानव्यविद्यांमध्ये केला जातो.