बोरिवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बोरीवली is located in मुंबई
बोरीवली
बोरीवली लोहमार्ग स्थानक

बोरिवली (Borivali) हे मुंबईचे उपनगर आहे.हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे.मुंबई विमानतळापासून बोरीवली १८ किलोमीटर वर तर चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ३३.४ किलोमीटरवर आहे. २०१०च्या जनगणनेत बोरीवलीची लोकसंख्या काही लाखांवर गेली आहे.[ संदर्भ हवा ] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड ही बोरीवलीची काही प्रमुख आकर्षणे आहेत.

इतिहास[संपादन]

पूर्वीच्या एक्सर,कांदिवली,शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठणे आणि इतर गावाचं मिळून आत्ताचं बोरीवली तयार झाला आहे."बोरीवली" हे नाव या भागात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या बोराच्या झाडांमुळे या भागाला मिळाल असा समाज आहे.कान्हेरी आणि मंडपेश्वर गुंफांमुळे बोरीवलीचा इतिहास खूप प्राचीन असावा असा मानायला हरकत नाही.ब्रिटीश याचा उच्चार बेरेवली (Berewlee) असा करत असतं.

महत्वाची ठिकाणे[संपादन]

बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ,पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल , वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास "जंगलातले उपनगर" असा म्हणायला काही हरकत नाही.शहराच्या वेढ्या त वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे.या जंगलात ४थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते.पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.

वाहतूक व दळणवळण[संपादन]

पश्चिम रेल्वेवरील हे एक महत्वाचे स्थानक आहे.हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात. तसेच प.रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात. बेस्ट बसची सुविधा उपलब्ध असून रिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे.

महत्वाच्या व्यक्ती[संपादन]

करमणुकीची साधने[संपादन]

पश्चिमेला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह आहे.येथे मराठी,गुजराती,हिंदी भाषेतील नाटके दाखवली जातात.

शैक्षणिक संस्था[संपादन]

बोरीवली
दूरध्वनी क्र.- +९१-२२-+९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कांदिवली
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दहिसर
स्थानक क्रमांक:२१ चर्चगेटपासूनचे अंतर ३३.९८किमी कि.मी.