दालन:क्रीडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Soccerball.png
Badminton racquet.svg
Baseball (crop).jpg
Basketball.png
Nuvola apps package games strategy.png
Pictgram running man.svg
Field hockey pictogram.svg
Cycling (road) pictogram.svg
Cricketball.png
Blackskate.svg
Snooker balls triangled.png
Alonso-WPF1logo.png
Golf ball.svg
Gymnastics128px.png
Hockey puck 2.jpg
Olympic rings with transparent rims.svg
IPC logo (2004).svg
Rugby P icon.png
Ru ball.svg
Swimming pictogram.svg
Tennisball2.png
Gamepad.svg
Sports and games.png

क्रीडा

क्रिडा आणि खेळ

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.

विशेष लेख

२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-० ने मात करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरूध्द केला. स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरूध्दच्या सामन्यात डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरकडून झाला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरूध्द केली. पुढे वाचा...

क्रीडेवर एक प्रकाशझोत

क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट ईंडिझ, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, केन्या आहेत.

Cricketball.png
अधिक माहिती..



बदला


स्टार खेळाडू

सुनिल गावस्कर(भारत)
Sunilgavaskar.jpg
सुनील मनोहर गावसकर (१० जुलै, १९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या.
क्रिकेट कारकिर्द
देश सामने धावा शतक अर्धशतक बळी
भारतचा ध्वज भारत १२५ १०१२२ ३४ ४५

सद्य क्रीडा स्पर्धा

Gola fek

-->

सद्य क्रिकेट स्पर्धा
सद्य हॉकी स्पर्धा‎
सद्य इतर स्पर्धा

gola fek

आपणास माहिती आहे का?

  • ...की भारताच्या १९वर्षाखालील खेळाडू अंबाटी रायुडूने २००४/५ मध्ये खेळल्या गेलेल्या १९वर्षाखालील कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध सलग तीन अर्धशतके केली होती?
  • ...की ऑगस्टीन केली हा उजव्या हाताने खेळणारा फलंदाज व यष्टीरक्षक १९२० आणि १९३० दरम्यान आयर्लंड क्रिकेट संघाकडून २५ वेळा खेळला होता?
  • ...की महिला एशिया कप स्पर्धा आता पर्यंत तीन वेळा खेळली गेली आहे?



बदला


महत्त्वाच्या स्पर्धा

सांघिक खेळ

तुम्ही काय करू शकता

  • आपण खेळ क्रीडा विषयातील रसिक, खेळाडू , क्रिडा शिक्षक,क्रिडा संपादक,क्रिडा बातमीदार लेखक अथवा वाचक प्रेक्षक असल्यास आपले येथे स्वागत आहे. आपण नविन लेख तयार करू शकता तसेच विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या लेखांमध्ये आपण आपले योगदान देउ शकता.
  • नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे.आणि अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:क्रीडा येथे भेट द्यावी.


नविन लेख
विस्तार