ग्रँड स्लॅम (टेनिस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रँड स्लॅम या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१० सालातील ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या तारखा

ग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डनयू.एस. ओपन ह्या आहेत.

ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते.

ह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे.

ग्रँड स्लॅम पूर्ण करणारे खेळाडू[संपादन]

आजवर टेनिसच्या इतिहासामध्ये केवळ सात पुरुष व ९ महिलांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. ब्यॉन बोर्ग, जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, व्हीनस विल्यम्स, जस्टिन हेनिन इत्यादी अनेक यशस्वी टेनिस खेळाडूंना ग्रँड स्लॅम पूर्ण करण्यात अपयश आले आहे.

पुरुष एकेरी[संपादन]

महिला एकेरी[संपादन]


सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे (खुले टेनिस युग)[संपादन]

खालील यादीत किमान सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे आजी व माजी टेनिस खेळाडू दर्शवले आहेत.

पुरुष[संपादन]

क्रम नाव देश ऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस. एकूण कार्यकाल वर्षे
1 रॉजर फेडरर स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड 4 1 6 5 16 2003–2010 8
2 पीट सॅम्प्रास Flag of the United States अमेरिका 2 0 7 5 14 1990–2002 13
3 ब्यॉन बोर्ग स्वीडन ध्वज स्वीडन 0 6 5 0 11 1974–1981 8
4 रफायेल नदाल स्पेन ध्वज स्पेन 1 6 2 1 10 2005–2011 7
5 आंद्रे अगासी Flag of the United States अमेरिका 4 1 1 2 8 1992–2003 12
= जिमी कॉनर्स Flag of the United States अमेरिका 1 0 2 5 8 1974–1983 10
= इव्हान लेंडल चेकोस्लोव्हाकिया ध्वज चेकोस्लोव्हाकिया 2 3 0 3 8 1984–1990 7
8 जॉन मॅकएन्रो Flag of the United States अमेरिका 0 0 3 4 7 1979–1984 6
= मॅट्स विलॅंडर स्वीडन ध्वज स्वीडन 3 3 0 1 7 1982–1988 7
10 बोरिस बेकर जर्मनी ध्वज जर्मनी 2 0 3 1 6 1985–1996 12
= स्टीफन एडबर्ग स्वीडन ध्वज स्वीडन 2 0 2 2 6 1985–1992 8


महिला[संपादन]

क्रम नाव देश ऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस. एकूण कार्यकाल वर्षे
1 स्टेफी ग्राफ जर्मनी ध्वज जर्मनी 4 6 7 5 22 1987–1999 13
2 मार्टिना नवरातिलोवा Flag of the United States अमेरिका 3 2 9 4 18 1978–1990 13
= ख्रिस एव्हर्ट Flag of the United States अमेरिका 2 7 3 6 18 1974–1986 13
4 सेरेना विल्यम्स Flag of the United States अमेरिका 5 1 4 3 13 1999–2010 12
5 मार्गारेट कोर्ट ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 4 3 1 3 11 1968–1973 6
6 मोनिका सेलेस Flag of the United States अमेरिका 4 3 0 2 9 1990–1996 7
7 बिली जीन किंग Flag of the United States अमेरिका 0 1 4 3 8 1968–1975 8
8 जस्टिन हेनिन बेल्जियम ध्वज बेल्जियम 1 4 0 2 7 2003–2007 5
= इव्होन गूलागॉंग ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 4 1 2 0 7 1971–1980 10
= व्हीनस विल्यम्स Flag of the United States अमेरिका 0 0 5 2 7 2000–2008 9

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]