मुंबई उपनगरी रेल्वे
| मुंबई उपनगरी रेल्वे | |||
|---|---|---|---|
| स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
| वाहतूक प्रकार | सार्वजनिक परिवहन | ||
| मार्ग | ३ (मध्य, हार्बर आणि पश्चिम) | ||
| मार्ग लांबी | ४२७.५ कि.मी. | ||
| एकुण स्थानके | १२२ | ||
| दैनंदिन प्रवासी संख्या | ६९.५ लाख | ||
| सेवा आरंभ | १८५७ | ||
|
|||
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवतात. उपनगरी रेल्वेने मुंबईत ६९ लाखहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणाल्यांपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन किंवा फक्त लोकल असे म्हणतात.
भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेनची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली.
मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत एक मेट्रो प्रणाली व मोनोरेल प्रणाली बांधली जात आहे.
मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे तीन मुख्य विभाग आहेत:
अनुक्रमणिका |
[संपादन] सेवा व सुविधा
ह्या सेवेत एकूण ४६५ किलोमीटर लांबीचे मार्ग आहेत. विरार ते चर्चगेट तसेच कसारा ते टिटवाळा या मार्गांवर धावणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या गाड्या या गाड्यांच्या वर टांगलेल्या विजेच्या तारांमधून मिळणाऱ्या २५,००० व्होल्ट ए.सी. वीज पुरवठ्यावर चालतात, तर बाकीच्या उपनगरी गाड्यांचा वीज पुरवठा १५०० व्होल्ट डी.सी. असतो. ह्या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी ३, ४ किंवा पाच ई.एम.यू. (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटे) जोडलेली असतात. युनिटांच्या संख्येनुसार गाडीला ९, १२ ,किंवा (फक्त पश्चिम रेल्वेमध्ये) १५ डबे असतात. अशा एकूण १९१ गाड्यांद्वारे २,३४२ फेऱ्यांतून रोज सुमारे ६९.४ लाखांहून जास्त प्रवाशी प्रवास करतात.
[संपादन] क्षेत्र व मार्ग
पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे, हे भारतीय रेल्वेचे दोन क्षेत्रीय विभाग ही रेल्वे प्रणाली चालवतात. सध्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर जलद उपनगरी गाड्या, मालगाड्या व दूर अंतरापर्यंत चालणाऱ्या मुख्य रेल्वे लाइनवरच्या गाड्या एकाच रूळजोडीवर धावतात. हार्बर मार्गावरच्या सेवा मध्य तसेच पश्चिम या दोन्ही विभागांच्या लोहमार्गांवर चालवल्या जातात.
[संपादन] पश्चिम रेल्वे (वेस्टर्न लाइन)
पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेटपासून डहाणू रोडपर्यंत चालवली जाते. समुद्रकिनाऱ्याला साधारणतः समांतर असे १२४ किमी ये-जा करणाऱ्या या मार्गावर दोन स्थानिक मंदगती, दोन द्रुतगती आणि वसई रोडपर्यंत एक अधिक असे चार/पाच लोहमार्ग आहेत. चर्चगेट ते विरारदरम्यानच्या ६० किलोमीटर अंतरात ई.एम.यूने ही सेवा पुरवली जाते तर विरार-डहाणू रोड मार्गावर (६४ किमी) एम.ई.एम.यू (मल्टिपल इलेक्ट्रिक मेनलाइन युनिट किंवा मेमू) द्वारे ही सेवा पुरवली जाते. या मेमू गाड्यांच्या काही फेऱ्या डहाणू रोड पासून वसई रोडद्वारे पनवेललाही जातात. उपनगरी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी महालक्ष्मी येथे कार्यशाळा आहे. शिवाय छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी तसेच रात्रीच्या मुक्कामास नेण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि कांदिवली येथे कार्यशाळा (कारशेड) आहेत. याशिवाय नाला सोपारा आणि विरारच्या मध्ये एक नवीन कार्यशाळा बांधली जात आहे. ही नवीन कार्यशाळा बांधून झाल्यावर ही आशियातील सगळ्यात मोठी कार्यशाळा होईल.
पश्चिम रेल्वेच्या इ.एम.यू गाड्या ९, १२ किंवा क्वचित १५ डब्यांच्या असतात. या गाड्या मंदगती (सगळ्या स्थानकांवर थांबणाऱ्या) किंवा जलदगती (विशिष्ट स्थानकांवरच थांबणाऱ्या) सेवा पुरवतात. उपनगरी फेऱ्या बहुधा मोठ्या व महत्त्वाच्या स्थानकांपासून तशाच दुसऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत असतात. या सेवांचे गंतव्यस्थान पहिल्या डब्याच्या दर्शनी भागात असते. हे गंतव्यस्थान रोमन लिपीतील एक किंवा दोन अक्षरांनी दर्शविले जाते.
| संक्षिप्त नाव | स्थानक |
|---|---|
| A | अंधेरी |
| B | वांद्रे |
| BC | मुंबई सेंट्रल |
| BO | बोरिवली |
| BY | भाईंदर |
| BS | वसई रोड |
| C | चर्चगेट |
| D | दादर |
| DR | डहाणू रोड |
| DS | दहिसर |
| G | गोरेगांव |
| M | मालाड |
| MR | मीरा रोड |
| PL | पनवेल |
| V | विरार |
[संपादन] मध्य रेल्वे (सेंट्रल लाइन)
मध्य रेल्वेची सेवा छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून उत्तरेकडे कल्याणपर्यंत (५४ कि.मी.) व त्यापुढे विभाजित होऊन ईशान्य दिशेत कसारा (६७ कि.मी.) किंवा आग्नेय दिशेत खोपोलीपर्यंत (६१ कि.मी) उपलब्ध आहे. यात सुद्धा छ.शि.ट. ते कुर्ला व ठाणे ते दिवाच्यादर्म्यान ४ लोहमार्गां, तसेच कुर्ला ते ठाणे व दिवा ते कल्याणच्या दर्म्यान ६ लोहमार्ग धावतात. कल्याणपुढे कसारा आणि खोपोली पर्यंत प्रत्येकी दोन लोहमार्गा धावतात. या मार्गांना 'मेन' लाईन असे देखिल संबोधतात. दादर आणि परळ या दोन स्थानकांवरून मध्य रेल्वे वरून पश्चिम रेल्वे वर मार्गांतरण करता येते. मध्य रेल्वेवर 'धिमी' व 'जलद' अशा दोन प्रकारच्या सेवा आहेत. धिम्या सेवेतील गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात. जलद गाड्या थोड्याफार फरकाने भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात. यातील दादर, कुर्ला, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर सर्व जलद गाड्या थांबतात. कल्याण पुढे सर्व गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात.
|
||||||||