छत्रपती राजारामराजे भोसले
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(छत्रपती राजाराम महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)
राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. संभाजीच्या मृत्युनंतर (१६८९ ते १७००) मराठी स्वराज्याचा अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सरदारांच्या साहाय्याने नेतृत्त्व केले. कारकिर्दीतील त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व स्वराज्याची धुरा सांभाळली. इ.स. १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यु झाला.