गुप्त साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुप्त साम्राज्य
px

IndiaGuptaEmpire1.jpg
इ.स. ३२० - इ.स. ६००
राजधानी पाटलीपुत्र
राजे २९० ते ३०५: पहिला चंद्रगुप्त
३३५ ते ३७०: समुद्रगुप्त
३१५ ते ४१५: चंद्रगुप्त विक्रमादित्य
४१५ ते ४५५: पहिला कुमारगुप्त
भाषा संस्कृत
क्षेत्रफळ वर्ग किमी


गुप्त साम्राज्याच्या काळात उभारलेला दिल्ली येथील लोहस्तंभ

.

गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्य, विज्ञानात खूप मोठी मजल मारली. अशा या गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इ.स. २४० ते इ. स. ५५० पर्यंत मानला जातो.

अनुक्रमणिका

गुप्त साम्राज्यातील राज्यकर्ते[संपादन]

सैन्य रचना[संपादन]

गुप्त साम्राज्याने सशक्त सैन्यबळावर राज्याचा विस्तार वाढवला. गुप्तांच्या लष्कराबद्दल बरीचशी माहिती, भारतीयांकडून नव्हे, तर चिनी व पाश्चिमात्य स्रोतांकडून जास्त कळते. गुप्तांची सैन्यरचना पारंपरिक भारतीय सैन्यरचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शिव धर्नुर्वेदामध्ये गुप्तांच्या सैन्य रचनेबद्दल माहिती सांगितली आहे. धनुष्यबाण हे मुख्य अस्त्र असल्याने गुप्तांची मुख्य फळी ही धनुर्धरांची होती. भारतीय धनुष्य हे मुख्यत्वे लांब बांबूचे बनलेले असे व फोकाचे बाण असत. बाणांच्या टोकाला लोखंडी टोक हे भारतीय बाणांचे वैशिष्ट्य होते. बांबूचा उपयोग भारतीय वातावरणात चांगलाच होत होता. भारतीय धनुर्धर खूप लांबून व अचून मारा करण्यात पटाईत होते व तत्कालीन वायव्य भागातून येणाऱ्या आक्रमकांविरुद्ध चांगलेच यशस्वी ठरत, असे दिसते. हूण शक सारख्या तत्कालीन आक्रमकांचे मुख्य अस्त्र घोड्यावरील धर्नुधर. त्यांना तोडीस तोड म्हणून भारतीयांनी घोड्यावरील धर्नुधारी दल बनवले नव्हते. असे असले तरी त्या काळचे भारतीय सैन्यदल या आक्रमकांविरुद्ध लढण्यास सक्षम होते, असे दिसते. भारतीयांनी अतिशय ताकदवान असे लोखंडी धन्य्ष्यही बनवले होते. ते जाड चिलखत सहज भेदू शके. परंतु अशी शस्त्रे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असत. भारतीयांनी लोखंडाची इतर शस्त्रे बनवण्यातही यश मिळवले होते. मात्र धर्नुधारी दलाला नेहेमी ढाल-तलवारी-भाल्यांनी युक्त अशा पायदळाचे संरक्षक कवच असे.

उत्तम रसद पुरवठा हेदेखील गुप्तांच्या यशामागचे कारण असू शकते. लढायांमध्ये हत्तींचा आक्रमणासाठी वापर, घोडदळाच्या व पायदळाच्या आक्रमणामागून धनुर्धारी दलाचा मारा अशी समन्वयात्मक युद्धशैली हे गुप्तांचे युद्धाचे डावपेच होते. त्यांचा प्रभावी वापर ते भारतातील इतर राज्यकर्त्यांविरुद्ध व परकीय आक्रमकांविरुद्ध करत. गुप्तांनी नौदलाचा वापरही केला होता.

हूणांच्या सततच्या आक्रमणाने गुप्त साम्राज्य क्षीण झाले. गुप्तांचे लष्करी सामर्थ्य कमी पडले असे मत इतिहासकारांना चुकीचे वाटते, कारण गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील सम्राट स्कंदगुप्तानेही हूणांना हुसकावून लावले होते. प्रामुख्याने अंतर्गत कलहाने व राजकारणाने गुप्तांचा प्रतिकार क्षीण पडला असावा.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]