बांबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांबू
बांबू चे क्योटो मधील जंगल , जपान
बांबू चे क्योटो मधील जंगल , जपान
शास्त्रीय वर्गीकरण
जात: मॅग्नोलिओप्सिडा
वर्ग: एक बीजपत्री
कुळ: रोजॅकी
उपकुळ: Bambusoideae
जातकुळी: Bambusodae
बम्बूसा
जाति

९२ वंश आणि ५००० जाति

चित्र:Mosogrove7051.jpg
बांबू ची बेटे

वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] प्रकार

पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणार्‍या जवळ जवळ 1400 बांबूंच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फूट वाढ सुद्धा होऊ शकते.

[संपादन] आशिया खंडातील बांबू

चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जाती त्यापासुन दुसरी काही उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, 75-फूट, उंचीपर्यंत वाढू शकतात. बांबूची चीनमधील शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात.

[संपादन] पिक वैशिष्ट्य

बांबूच्या पिकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने कीटकनाशकांचा वापर सुद्धा कमी होतो.

[संपादन] उत्पादन

बांबूचे एशियामधले उत्पादन गेल्या 20 वर्षांत झपाट्याने वाढले आहे. चीनमधेच बांबूचे उत्पादन 2008 मध्ये 2000 सालच्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. छोट्या छोट्या जागांच्यावर चिनी खेडेगांवामधले शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. व हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण 5 टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे.

[संपादन] प्रक्रिया

चित्र:Bamboo 4.jpg
बांबूचे फ्लोअरिंग

बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्या प्रथम कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांच्यात वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्यांना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून त्यांचे फळ्या किंवा प्लाय-बोर्डचे तक्ते या स्वरूपातले व्यापारी उत्पादन तयार होते. या शिवाय बांबूचे अतिशय छोटे तुकडे सरसामधे भिजवून याच पद्धतीने त्यांच्या विटा किंवा तक्तेही बनवले जातात. या सर्व उत्पादनांना नैसर्गिक रंगही ठेवता येतो किंवा रंग वापरून आपणास पाहिजे ती रंगछटा उत्पादित करता येते.

[संपादन] उपयोग

इमारतीचे बांधकाम.
 house from Bambou Habitat
संर्पूण बांबू पासून बनविलेले घर
ASUS कंपनीचा लॅपटॉप

बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्टस, मोजे, टॉवेल्स् आणि इतकेच काय डायपर्स सुद्धा मिळतात. सायकलींच्या फ्रेम्स,स्केटिंग करण्याच्या फळ्या किंवा लॅपटॉप संगणकांचे बाह्य कवच ह्या गोष्टी सुद्धा बांबूंपासून बनवल्या जातात.
बांबूची अशी उत्पादने किती कठिण असतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. हा कठीणपणा बांबू किती जुना आहे यावर अवलंबून रहातो. तज्ञांच्या मते 5 ते 6 वर्षाचे जुने बांबूचे पीक पुरेसे कठिण असते. असा बांबू वापरून व योग्य उत्पादन प्रक्रिया केलेले बांबूचे फ्लोअरिंग हे लाकडाच्या पेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचे नसते.
बांबूचे फ्लोअरिंग व तक्ते हे दिवसें दिवस त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाला मदत करणारा ‘हरितपणा’ यामुळे लोकप्रिय होत आहेत.उपनगरातील घरे, सरकारी इमारती, हॉटेल्स, रेस्तॉरंट्स, शाळा या सर्व ठिकाणी बांबूचे फ्लोअरिंग वापरणे शक्य आहे. असा दिवस फारसा दूर नसावा की जेंव्हा बांधकामात लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्य होईल.

[संपादन] बांबूचे प्राण्यांच्या आहारातील स्थान

बांबू हा जायंट पांडा चे मुख्य अन्न आहे,जे त्याच्या आहारातील ९९% अनुशेष भरून काढते

बांबू ची कोवळी पाने,फांद्या,कोंब हे चिन मधील जायंट पांडा व नेपाळ मधील लाल रंगाच्या पांडाचे मुख्य अन्न आहे.
उंदिर काही वेळेस याची फळे खातात.
आफ्रिकेतील जंगलातील गोरिला सुध्दा बांबू चे सेवन करतात.

[संपादन] छायाचित्रे

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये