शिलाहार वंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिलाहार वंशची तीन घराणी होती. इ.स. ९ ते १३ वे शतक म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार राजे तगरपूरवराधिश्वर असे बिरूद लावीत. सिंघण यादवने शिलाहारांचा पराभव केला.

राजधानी[संपादन]

शिलाहार राजांची राजधानी गोमंतकातील वलीपट्टण ही होती.

दक्षिण कोकणचे शिलाहार[संपादन]

या घराण्याचा संस्थापक हा विद्याधर जीमुतवाहन हा होता. त्यानंतर सणफुल्ल, धम्मीयार, अवसर प्रथम, इंद्रराज, अवसर तृतीय, रठ्ठराज इ.राजे झाले.

उत्तर कोकणचे शिलाहार[संपादन]

कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. त्यांनतर पुल्लशक्ती, झंझ, प्रथम अन द्वितीय वज्जड, छित्तराज, अपरार्क प्रथम, मल्लिकार्जुन आणि सोमेश्वर असे राजे झाले. यांची राजधानी दंडराजपुरी, ठाणे आणि घारापुरी येथे होती.

कोल्हापूरचे शिलाहार[संपादन]

हे कोल्हापूर, मिरज, कऱ्हाड आणि कोकणच्या काही भागात राज्य करत होते. जतिग हा मूळ पुरुष होता. त्यानंतर न्यायवर्मा, चंद्र, जतिक द्वितीय, मारसिंह, गुहल द्वितीय, भोज प्रथम, बल्लाळ, गंडारादित्य, विजयादित्य आणि भोज द्वितीय असे राजे होऊन गेले.

भोज राजा द्वितीय[संपादन]

भोज राजा हा प्रसिद्ध राजा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील होता. त्याने बावडा, भुदरगड, खेळणा, पन्हाळा, पावनगड, सामानगड, पांडवगड असे किल्ले बांधले.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.