मेघदूत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेघदूत हे कवी कालिदासाने लिहिलेले संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. या महाकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी कुसुमाग्रज (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्तवाची.

मेघदूतावर आधारित चित्रे[संपादन]

मेघदूतामध्ये कालिदासाने प्राचीनकालीन भारताची अनेक दृश्ये वर्णिली आहेत. त्यांच्यावर आधारित कल्पनाचित्रे अनेक चित्रकारांनी रंगवली आहेत. कदाचित त्यांपैकी सर्वात सुंदर चित्रे पुण्याचे चित्रकार नाना जोशी यांची म्हणावी लागतील. त्यांतील काही चित्रे http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/ ह्या त्यांच्या संकेतस्थळावर पहावयास मिळतील.

बाह्य दुवे[संपादन]