स्पॅनिश साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पॅनिश साम्राज्य
Flag of स्पॅनिश साम्राज्य
Location of स्पॅनिश साम्राज्य
एके काळी स्पॅनिश साम्राज्याचा हिस्सा असलेले जगातील भूभाग

     आयबेरियन संघामधील पोर्तुगीज साम्राज्याचे भूभाग (इ.स. १५८१ - १६४०).      उट्रेक्त-बादेन तहादरम्यान गमावलेले भूभाग (इ.स. १७१३ - १७१४).      स्पॅनिश अमेरिकन स्वातंत्र्य युद्धांदरम्यान गमावलेले भूभाग (इ.स. १८११ - १८२८).      स्पॅनिश-अमेरिकन युद्धामध्ये हरलेले भूभाग (इ.स. १८९८ - १८९९).      स्वातंत्र्य मिळालेल्या आफ्रिकन वसाहती (इ.स. १९५६ - १९७६).

     स्पेनच्या अधिपत्याखालील सद्य भूभाग.

स्पॅनिश साम्राज्य (स्पॅनिश: Imperio Español) हे इतिहासातील स्पेन व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप, आफ्रिका, अमेरिकाओशनिया खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. शोध युगादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते.

ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व कॅरिबियनमधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व आग्नेय आशियामधील स्पॅनिश ईस्ट इंडिजवर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय पश्चिम युरोपातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.