डॅनिश वसाहती साम्राज्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डॅनिश वसाहती साम्राज्याची सुरुवात १३व्या शतकात झाली, जेंव्हा डेन्मार्कने एस्टोनियात प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. १५३६ साली डेन्मार्क व नॉर्वेचे एकत्रीकरण झाले, यानंतर डेन्मार्क-नॉर्वे या नव्या देशाने फेरो द्वीपसमूह, आइसलँड व ग्रीनलँड जिंकले. १८१४ साली नॉर्वे स्वीडनला आंदण देण्यात आले (नेपोलियोनिक युद्धे). यामुळे वसाहती डेन्मार्कच्या हातात गेल्या.