गुजराती भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुजराथी
ગુજરાતી
स्थानिक वापर भारत
प्रदेश गुजरातमहाराष्ट्र (मुंबई)
लोकसंख्या ६.६ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी गुजराती वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

भाषा संकेत
ISO ६३९-१ gu
ISO ६३९-२ guj
ISO ६३९-३ guj
भाषिक प्रदेशांचा नकाशा

गुजराती (मराठीत गुजराथी), ही भारत देशाच्या गुजरात राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून आजच्या घडीला सुमारे ६.६ कोटी लोक गुजराती भाषक आहेत. भाषिक संख्येच्या बाबतीत गुजरातीचा जगातील भाषांमध्ये २६वा क्रमांक लागतो.

गुजरात तसेच मुंबईमध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारताबाहेर पूर्व आफ्रिका, अमेरिकाइंग्लंडमध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. प्रसिद्ध भारतीय पुढारी महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल तसेच आघाडीचे उद्योगपती धीरूभाई अंबानी, जे.आर.डी. टाटा इत्यादी व्यक्तींची गुजराती ही मातृभाषा होती.

हेसुद्धा पाहा[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत