बोडो भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोडो
बड़ो
स्थानिक वापर भारत
प्रदेश आसाम
लोकसंख्या १३ लाख
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-३ brx[मृत दुवा]
बोडो नृत्य

बोडो ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक भाषा आहे. ही भाषा बोडो जमातीचे सुमारे १३ लाख लोक वापरतात.

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार बोडो ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

बोडो हा चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषांचा आसामातला गट आहे. बोडो गटात गारो, त्रिपुरी व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत. बोडो भाषेतील उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून भाषिक परिवर्तनात बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ना.गो. कालेलकर. बोडो भाषा. मराठी विश्वकोश (वेब ed.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा[संपादन]