भाषाकुळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भाषाकुळ किंवा भाषापरिवार म्हणजे एकाच प्रमुख स्रोतामधून उत्क्रांती पावलेल्या भाषांचा समूह. एका भाषाकुळातील भाषांचे मूळ समान असते. एथ्नॉलॉगच्या अहवालानुसार २००९ साली जगात ६,९०९ जागृत भाषा होत्या. प्रत्येक भाषा कोणत्या कुळात मोडावी ह्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा आधार घेतला जातो.
जगातील भाषा खालील ढोबळ कुळांमध्ये विभागल्या जातात. काही भाषा ह्यांपैकी कोणत्याच कुळात चपखल ठरत नसल्याने त्यांना एकाकी भाषा असे संबोधले जाते.
- इंडो-युरोपीय: जगातील ४६ टक्के लोक इंडो-युरोपीय भाषा वापरतात.
- चिनी-तिबेटी: २१% (पूर्व आशिया)
- नायजर-काँगो: ६.४% (सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिका)
- आफ्रो-आशियन: ६% (उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व)
- ऑस्ट्रोनेशियन: ५.९% (ओशनिया, आग्नेय आशिया, मादागास्कर)
- द्रविडी: ३.७% (दक्षिण आशिया)
- ऑस्ट्रो-आशियन
- तुर्की
- युरली