१ मे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो.
| << | मे २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ||
| ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
| १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ | १९ |
| २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
| २७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
अकरावे शतक [संपादन]
चौदावे शतक [संपादन]
- १३२८ - एडिनबर्ग-नॉर्थहॅम्पटनचा तह - इंग्लंडने स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली.
अठरावे शतक [संपादन]
- १७०७ - ऍक्ट ऑफ युनियन - इंग्लंड व स्कॉटलंडने एकत्र येउन ग्रेट ब्रिटन या राष्ट्राची निर्मिती केली.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८३४ - इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य ठरवण्यात आली.
- १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-चान्सेलरव्हिलची लढाई.
- १८८६ - या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
- १८९८ - मनिला बेची लढाई - अमेरिकेच्या आरमाराने स्पेनची जहाजे बुडवली.
विसावे शतक [संपादन]
- १९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.
- १९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- १९३१ - न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.
- १९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
- १९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
- १९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
- १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
- १९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.
- १९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.
एकविसावे शतक [संपादन]
- २००३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले.
जन्म [संपादन]
- १२१८ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १९१५ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी
- १९२० - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक
- १९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.
- १९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ४०८ - आर्केडियस, रोमन सम्राट.
- १३०८ - आल्बर्ट पहिला, हॅब्सबर्गचा राजा.
- १५७२ - पोप पायस पाचवा.
- १९३१ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार.
- १९४५ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
- १९७२ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
- १९९३ - पिएर बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.
- १९९३ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
- १९९४ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
- १९९८ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
- २००२ - पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- महाराष्ट्र दिन - महाराष्ट्र.
- गुजरात दिन - गुजरात.
- कामगार दिन - अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
- लेइ दिन - हवाई.
- बेल्टेन - आयर्लंड.
- राष्ट्रीय प्रेम दिन - चेक प्रजासत्ताक.
- कायदा दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर १ मे च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे महिना