हैदराबाद संस्थान
हैदराबाद राज्य
[संपादन]मुख्यत्वे गोदावरी नदीच्या खोऱ्यात पसरलेले सुलतानात-ए-आसफिया हैदराबाद राज्य प्रशासकीय दृष्ट्या ४ विभाग आणि १६ जिल्ह्यांमध्ये विभागले होते. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, लातूर , बीड, नांदेड आणि परभणी हे जिल्हे होते. गुलबर्गा विभागात बिदर, गुलबर्गा, धाराशिव, रायचूर जिल्हे, गुलशनाबाद किंवा मेदक विभागात अत्राफ इ बलदाह, महेबूबनगर, मेदक, नालगोंडा, निझामाबाद जिल्हा; तर वरंगळ विभागात आदिलाबाद जिल्हा, करीमनगर आणि वरंगळ जिल्हा होता .
निजामाने इतर बराचसा भाग ब्रिटिशांना विविध वेळी विविध कराराअंतर्गत संपूर्ण किंवा भाडेपट्ट्यावर बहाल केला. प्रशासकीय व्यवस्था मुख्यत्वे सरंजामशाही स्वरूपाची होती. शेतसारा वसुलीकरिता जहागिरी बहाल केलेल्या असत. निजाम हा करांचा काही भाग वेगवेगळ्या वेळी मोगल, मराठे, इंग्रज इत्यादींना तत्कालीन करारांनुसार चौथाई स्वरूपात देत असे. प्राप्तिकर नसे.
सुलतानात-ए-आसफिया हैदराबादमध्ये सुरुवातीस फार्सी, नंतर उर्दू भाषा प्रशासकीय व शैक्षणिक व्यवहाराच्या भाषा होत्या; तर जनता प्रामुख्याने तेलुगू, कन्नड व मराठी भाषक होती. इ.स. १९३०मध्ये निजामाकडे ११,००० कर्मचारी होते. स्थानिक मुस्लिम कर्मचाऱ्यांना मुल्की व इतर राज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांना गैरमुल्की म्हणत. स्वतंत्र पोस्ट, चलन, पोलीस व रेल्वे यंत्रणा होती. लोकसंख्या १,८०,००,००० होती, ती मुख्यत्वे, हिंदू होती.
हैदराबाद राज्याचा निजामपूर्व इतिहास
[संपादन]प्रागैतिहासिक
[संपादन]गोदावरी खोऱ्यातील प्रागैतिहासिक काळाबद्दल विश्वासार्ह ऐतिहासिक पुराव्यांची उपलब्धता नाही. काही आर्य-द्रविड संघर्ष ग्राह्य धरणारे इतिहासकार गोदावरी खोऱ्यात प्रागैतिहासिक काळात द्रविड असावेत असे समजतात त्व त्याच्या समर्थनार्थ अगस्त्य मुनींनी विंध्य पर्वतास दिलेल्या भेटीचा पौराणिक दाखला देतात. गौतम ऋषी व वसिष्ठ मुनींचा ही या भागात संचार झाला होता. http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nanded/his1.html]
ऐतिहासिक
[संपादन]बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, सुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव यांचे या भागात कधीना कधी राज्य होते.,
मध्ययुगीन
[संपादन]इ.स ११९८ मध्ये येथे काकतीय वंश असलेले नरेश गणेश गणपति यांचे राज्य होते राजे गणेश गणपति यांनी गोलकुंडा येथे एक भव्य किल्ला बांधून घेतला. आणि या शहराचे नामकरण भाग्य नगर असे केले. क्रूर आक्रमक अल्लाउलुद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक उर्फ वेडा मुहम्मद, गुलबर्गा आणि बिदरचे मूळ हिंदू असलेले बहामनी, इ.स. १४५५ जलालखान (तेलंगणा), मुहम्मद खिलजी, गोवळकोंड्याचा इब्राहीम कुतुबशाह यांनीही हैदराबादवर राज्य केले आहे. इ.स. १६००मध्ये अकबराच्या काळात अहमदनगर मोगलांनी घेतले. जहांगीर व तदनंतर शहाजहानच्या जातीने युद्धात उतरल्यानंतर इ.स. १६३२ पर्यंत तेलंगणापर्यंत मोगलांनी वर्चस्व निर्माण केले. विजापूरच्या आदिलशहाने शहाजहानशी तडजोड करून अहमदनगर राज्याचा काही भाग स्वतःकडे मिळवला. याच काळात शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या आणि नंतर विजापूरच्या दरबारी सरदार होते.
इ.स. १६५३ मध्ये औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला. औरंगजेबाने सुरुवातीचा काळ करप्रणालीचा अमल घडवण्यात घातला. इ.स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आग्ऱ्यास जाऊन बादशाही मिळवली. औरंगजेबाने वैयक्तिकरीत्या प्रयत्न करून इ.स. १६८६मध्ये विजापूर व इ.स. १६८७ मध्ये गोळकोंडा मोगलांसाठी मिळवले. मराठवाडा आणि बेरार अमरावतीतील मराठ्यांची पाठशिवणी तात्पुरती थांबली. इ.स. १६२० नंतर छत्रपती शिवाजी महराजांनी मराठी राज्याची रस्थापना केली. परंतु मराठ्यांचे राज्य औरंगजेबास मिळू शकले नाही. दुष्काळांचे उल्लेख विविध काळात दिसतात, त्यात्या वेळच्या राज्यकर्त्यांकरता तो काळ सर्वसाधारणता राजकीयदृष्ट्या कठीण गेल्याचे दिसून येते. ते काळ असे :- इ.स. १३९६ ते इ.स. १४०७; इ.स. १४२१ ते इ.स. १४२२; इ.स. १४७३ ते इ.स. १४७४; इ.स. १६२९ ते इ.स. १६३०. मध्ययुगीन इतिहासाचे दुसरे वैशिष्ट्य असे की दिल्लीच्या काही बादशहांना दक्षिणेस खास करून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर भागांत जातीने यावे लागले. परिणामी छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचे मध्ययुगीन काळातील राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र राहिले.
हैदराबादचे निजाम
[संपादन]सुलतानात-ए-आसफिया निजामशाहीची स्थापना
[संपादन]सतत पराभवातून स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्याचे तुरळक उदाहरण निजामचे संस्थान हे एक आहे. कधीही विजय झाला नाही हे याचे वैशिष्ट्ये. मराठ्यांबरोबरची पहिली लढाई : हार. दुसरी : हार. तिसरी : हार. असे जे सतराशे तेवीस-चौवीसपासून चालले ते सतराशे ब्याण्णवपर्यंत. सर्व मोठ्या लढ्यांत निजामाची हार झालेली दिसून येते. इ.स. १६८७च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक गोवळकोंडा किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानाचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा मीर क़मरुद्दीन यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसियाने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता इ.स. १७२४ मध्ये एक लढाई घडवून आणली. तीत मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीचा विजय झाला आधीच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर ओमारुद्दीनची प्रगती थांबवू शकली नाही.
मीर ओमारुद्दीन / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे ठेवली व काही दिवसातच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी इ.स. १७२४ ते इ.स. १९४८ या काळात उपभोगले. असिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबूत केली. २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबातजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे हे घराणे समरकंद या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात बगदादचे होते.[१] मीर उस्मान अली खान हा शेवटचा निजाम होता. बऱ्याचदा तो 'हिंदू आणि मुस्लिम हे त्याचे दोन डोळे आहेत', असे म्हणे.[१][२]
निजाम उल मुल्क
[संपादन]- मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी - (शीर्षकः चिन किलिच खान) असिफ जाह १ इ.स. १७२४ - इ.स. १७४८
- निज़ाम - उल - मुल्क, आसफ जाह दुसरा- (शीर्षकः निझाम उल मुल्क) असिफ जाह २ इ.स. १७६२-इ.स. १८०२
- मीर अकबर अली खान - (शीर्षकः सिकंदर जाह) असिफ जाह III इ.स. १८०२-इ.स. १८२९
- मीर फर्खुंदाह अली खान - (शीर्षकः नसिरुद्दौला) असिफ जाह ४ इ.स. १८२९-इ.स. १८५७
- मीर तेहनियत अली खान - (शीर्षकः अफजलौद्दौला) असिफ जाह ५ इ.स. १८५७-इ.स. १८६९
- मीर महबूब अली खान - असिफ जाह ६ इ.स. १८६९-इ.स. १९११
- मीर उस्मान अली खान - (शीर्षकः निझाम सरकार) असिफ जाह ७ इ.स. १९११-इ.स. १९४८
पहिल्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले. विविध करारांअंतर्गत निजाम ब्रिटिश सत्तेचे पाईक ठरले. निजामास पुरवलेल्या तथाकथित संरक्षणाचा व सैन्याचा आर्थिक मोबदला म्हणून निजामाकडील काही प्रांत, खास करून बेरार म्हणजे आताचे अमरावती इंग्रजानी मिळवले. निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला.
हैदराबादवर नासीरजंग मीर अहमद इ.स. १७४८-इ.स. १७५०; # मुहिउद्दीन मुज्जफरजंग हिदायत इ.स. १७५०-इ.स. १७५१; # असिफ़ दौला मीर अली सालाबात इ.स. १७५१-इ.स. १७६२ या राजांनी राज्य केले. त्यांचे "निझाम" हे नाव कधीच नव्हते
हिंदूंचा निझामावर सातत्याने विजय
[संपादन]आसीफ जाहच्या आधीच्या मोगल-मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी फौजांनी काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे व मोगल अधिपत्याखालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात. नेताजी पालकर-इ.स. १६६२, प्रतापराव-इ.स. १६७० बेरार, ऑक्टोबर इ.स. १६७२ रामगीर जिल्हा करीमनगर, ऑक्टोबर इ.स. १६७४ शिवाजी - बेरार. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७७ गोवळकोंड्यावर आक्रमण करून कुतुबशहाला तह करायला लावले.
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजू घेतल्याने काही काळ मराठवाड्याचाचा काही भागाचे चौथ (शेतसाऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले, पण भावी निजाम असिफजहाने कोल्हापूर आणि सातारा या गाद्यांच्या संघर्षाचा फायदा घेऊन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथाई देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्षाच्या आणि स्वतःच्याचे सैनिकी यशाच्या बळावर इ.स. १७२४ पर्य़ंत स्वतःला स्वतंत्रपणे निझाम या नावाने प्रस्थापित केले.
मराठ्यांचे शौर्य
[संपादन]छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत इ.स. १७२८ निजामाचा पराभव झाला आणि मानहानी सहन करावी लागली. तर इ.स. १७३३ मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबादचे आक्रमण सोडून माघार घ्यावी लागली. इ.स. १७३७ मध्ये हिंदू पेशवा बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा दारुण पराभव केला व त्याला पळून जावे लागले. मग निजामाने दक्षिणेत लक्ष घातले आणि तेथे आपले नियंत्रण प्रस्थापित केले. ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निजामअली यांच्यात राक्षसभुवनची लढाई झाली. निझाम अली या निजामास १७६३ च्या राक्षसभुवनच्या लढाईत मराठ्यांनी पुरते नमवले. यात हैद्राबादच्या मुस्लिम निझामाचा दारुण पराभव झाला. शेवटी् युद्धविराम झाला आणिसंभाजीनगर येथे एकतह झाला , ज्यानुसार निजामाने भालकीसह आपला मोठा प्रदेश मराठ्यांना दिला. नेऊरगाव आणि लिंबागणेश हे भागही मराठा हिंदू साम्राज्याचा भाग बनले. या निर्णायक विजयाने मराठे अधिक शक्तीशाली बनले आणि मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले.
मोगल, टिपू, ब्रिटिश आणि निजाम
[संपादन]असिफजहाच्या मृत्यूनंतर निजामाच्या वंशजांमध्ये झालेल्या संघर्षात सलाबतजंगची बाजू घेऊन मराठ्यांनी पुन्हा चौथाईचे अधिकार मिळवले. पण सलाबतजंग गादीवर टिकू शकला नाही. परंतु इ.स. १७६६ आणिइ.स. १७६८ साली ब्रिटिशांशी करार करून संरक्षणाच्या बदल्यात ब्रिटिशांची मांडिलकी करणे निझाम अलीने पसंद केले. इ.स. १७९९मध्ये टिपूचे राज्य संपले. इ.स. १८१८मध्ये पेशवाई संपली. पेशवाईच्या अस्तानंतर निजामशाही पुढे १३० वर्षे टिकली पण ब्रिटिश म्हणतील ती पूर्व दिशा ठरली. निजामाला धार्मिक व्यवस्थे व्यतिरिक्त फारसे अधिकार दिले नव्हते.
बेरार
[संपादन]निजामास इंग्रजांच्या सैन्यास पैसा देणे जमेना तेव्हा इंग्रजांनी इ.स. १८५१मध्ये बेरार अमरावती प्रांत तोडून घेतला व निजामाचा स्वतःचे सैन्य बाळगण्याचा अधिकार कायमचा संपला. इ.स. १८५७पासून निजामाने ब्रिटिशांशी संपूर्ण मैत्री ठेवली. रोहिल्यांनी आणि काही जहागिरदारांनी तत्कालीन क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली अयशस्वी बंड केले. निजामाच्या विश्वासाची भरपाई ब्रिटिशांनी ५१ लाखाचे निजामाचे कर्ज माफ करून केली.
सुलतानात-ए-आसफिया निजाम कालीन शासन व्यवस्था
[संपादन]सरंजाम
[संपादन]सरदार आणि घराणी मूळ मुसलमानी मोगल पद्धतीनुसार होती. हे लोक पूर्वी निजामने परवानगी दिली तेवढी फौज बाळगत. निजामच्या आज्ञेवरून त्यांना युद्धास जावे लागे. सैन्याचे व युद्धाचे खर्च निघावेत म्हणून त्यांना वतने (मनसब)/जहागिरी बांधून दिली जात असे. त्या वतनातील शेतसारा गोळा केला जाई व ठरवलेलाला भाग निजामला दिला जात असे. त्यांच्या वतनांवर त्यांचा दर्जा अवलंबून असे. दर्जानुसार चढत्या श्रेणीने खान, खान बहादुर, नवाब, जंग, दौला, मुल्क, उमरा, जाह अशी पदवी त्यांना मिळे. तर विभागांची जबाददारी मोगल बादशहा, वजीर, सुभेदार, निजाम इत्यादींकडे देत. हिंदू सरदारांना राय, राजा, राजा बहादुर, राजा राय, रायन बहादुर, वंत, महाराजा, महाराजा बहादुर अश्या पदव्या असत. पण ब्रिटीशोत्तर काळात सैन्य बाळ्गण्याचा अधिकार संपल्यानंतर त्यांना फक्त महसूल गोळा करण्याचे अधिकार किंवा तनखा ठरवून देण्याचा अधिकार मिळाला. काही निजामपूर्व स्थानिक राजांनी पण आपली संस्थाने निजामास शरण जाऊन टिकवून ठेवली. यांत गडवाल, वानापुर्ति, जतप्रोले, अमरचंटा, गुरूगुंटा, गोपालपेट, जवालगिरी, सोलापूर इत्यादींचा समावेश होता.
सालारजंगच्या सुधारणा १८५३-१८८३
[संपादन]निजामाच्या इस्लामिक सुलतानात-ए-आसफिया राजवटीच्या तत्कालीन प्रधान मंत्री सालारजंगने ब्रिटिशांचे पाहून इ.स. १८५८पासून प्रशासनात सुधारणा करणे सुरू केले.इ.स. १८६७मध्ये विभाग,जिल्हे आणि तालुका पातळीवर पगारी नोकरदारांची भरती सुरू केली. पोलीस, न्याय, शिक्षण, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांची घडी घातली पण ही इस्लामी राज्याच्या पद्धतीने होती. भारतभरातून तत्कालीन सुशिक्षित मुस्लिम समाजास प्रशासनात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. अलीगडच्या सर सय्यद अहमदना आर्थिक पाठबळ पुरवले. इ.स. १८७५मध्ये जमीन महसूल गोळा करण्याची मुंबई विभागात होती तशी ब्रिटिश पद्धत सुरू केली. इ.स. १८६०मध्ये हैदराबाद-सोलापूर रस्ता व इ.स. १८६८-इ.स. १८७८ या काळात ब्रिटिशांच्या सहकार्याने हैदराबाद राज्यात रेल्वे सुरू झाली. उर्दू आणि इंग्रजी जर्नल्सची सुरुवात झाली पण इतर हिंदू अथवा भारतीय भाषांना परवानगी दिलेली नव्हती.
निजामाची सहिष्णुता
[संपादन]या भागात शिया मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहेत. आणि सुन्नी मुस्लिम त्यांना तेथे राहू देत असत. इ.स. १८९८मध्ये मुस्लिम निजामाने राजकीय सुधारंणांचे गाजर दाखवले. cabinet व legislative councilची स्थापना केली यात मर्यादित संख्येत निजामाचे शासकीय कर्मचारीच होते. सर्वाधिकार निजामाकडेच होते त्यामुळे ह्या सुधारणा सुशिक्षितांचे समाधान करू शकल्या नाहीत.[३]
निजामाच्या इस्लामिक राज्यात हिंदूंचा छळ झाला. रझाकार हे ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्यातील सुन्नी मुस्लिम राष्ट्रवादी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाचे क्रूरकर्मा आणि हिंदू द्वेषी कासिम रिझवी यांच्या नेतृत्वात उभे केलेले दोन लाख संख्येचे निमलष्करी स्वयंसेवक दल होते. बहुसंख्य-हिंदू समुदायाच्या उठावाच्या भीतीने, निजामाने कासिम रझवी यांच्या नेतृत्वाखालील रझाकारांच्या निर्मितीला मंजूरी दिली ते हैदराबादमध्ये मुस्लिम राजवट टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतात एकीकरणास विरोध करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. कासिम रिझवीने हिंदूंशी शी लढण्यासाठी सशस्त्र रझाकारांच्या टोळ्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाठवल्या. रझाकारांनी हिंदूंचा धार्मिक छळ केला. तेलंगणातील वीरा बैरनपल्ली या गावात पुरुषांनी गोळ्या घालून ठार मारून हिंदू महिलांवर निर्दयीपणे बलात्कार केले. या दहशतीपासून वाचण्यासाठी अनेक गावकऱ्यांनी शेतातील मोकळ्या विहिरीत उड्या घेतल्या. अनेक मंदिरेही रझाकारांनी लुटली.[४] रझाकारांनी १९४८ मध्ये ऑपरेशन पोलोद्वारे त्यांच्या सैन्याचा पराभव होईपर्यंत त्यांची हिंदू विरोधी धार्मिक अत्याचारांची रानटी मोहीम सुरू ठेवली होती.
हैदराबाद संस्थानाचे प्रशासकीय विभाजन
[संपादन]सुलतानात-ए-आसफिया हैदराबाद संस्थानाचे चार प्रशासकीय विभाग होते. आणि एकूण सर्व मिळून १६ जिल्हे होते.
अ] छत्रपती संभाजीनगर विभाग-
- . छत्रपती संभाजीनगर जिल्हा
- . बीड
- . नांदेड
- . परभणी
आ] गुलबर्गा विभाग-
इ] मेडक विभाग-
ई] वरंगळ विभाग-
निजामकालीन समाज, अर्थकारण
[संपादन]निजाम कालखंडात पाटीलकीची वतने मुसलमानांना मिळत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Nizam gave funding for temples, and Hindu educational institutions". 6 ऑक्टोबर 2018 रोजी पाहिले.
- ^ "National Anthem of the Kingdom of Hyderabad". cbkwgl (इंग्रजी भाषेत). 2013-08-31. 2018-10-29 रोजी पाहिले.
- ^ "Modern Hyderabad is the vision of Nizam Mir Osman Ali Khan".
- ^ Rao, Gollapudi Srinivasa (2017-09-16). "How Bhairanpally was plundered" (इंग्रजी भाषेत). Maddur (siddipet Dt.). ISSN 0971-751X.