सस्तन प्राणी
Appearance
ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.
उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.
हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.
उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ
प्रकार
[संपादन]सस्तन प्राण्यांची श्रेणीनुसार यादी
- किटाद (Insectivora) हे किडे खाणारे पशू आहेत. यांना पाच बोटे असतात आणि तोंड लांबट असते. उदा. चिचुंदरी
- निपतत्री (Dermoptera) यांना पंख असतात, त्यात सांगाडा नसतो, पंख केवळ खाली उतरण्याच्या उपयोगी पडतात. उदा. पंखवाले लेमूर
- उत्पतत्री (Chiroptera) यांना पंख असतात, त्यात हाडाचा सांगाडा असतो, ते वर उडण्याच्या उपयोगी पडतात पण यांना पिसे नसतात. उदा. वटवाघुळे
- प्रकृष्ट (Primates) यांचा मेंदू प्रकर्ष पावलेला असतो. यांना मूठ आणि चिमूट वळता येते. यातील प्राण्यांना पशूत्तम आणि जीवोत्तम असेही म्हणतात. उदा. माणूस
- अदंत (Edentata) यांना दात नसतात किंवा असले तरी ते कुरतडण्याच्या कामी येत नाहीत. उदा. पँगोलिन
- कृंतक (Rodentia) यांचे दात कुरतडण्याच्या कामी उपयोगी असतात. उदा. उंदीर
- मांसाहारी (Carnivora) यांना मांस खाण्यासाठी सुळे व दाढा असतात. उदा. मांजर
- तिमी (Cetacea) शाकाहारी, जलचर पशू, यांना तुरळक केस असतात. उदा. देवमासा
- रिमी (Sirenia) हे सुद्धा शाकाहारी जलचर पशू आहेत, यांना केस नसतात.
- '''सीलार (Pinnipedea) सील आणि वल्लर प्राणी या श्रेणीत आहेत.
- शुंडावंत (Proboscidea) या प्राण्यांना सोंड असते. उदा. हत्ती
- अयुग्मखुरी (Perissodactyla) यांच्या पायांना विषमसंख्य खूर असतात. उदा. घोडा
- युग्मखुरी (Artiodactyla) यांच्या पायांना समसंख्य खूर असतात. उदा. गाय
सस्तन प्राण्यांमध्ये मांसाहारी, किटाहारी, शाकाहारी, कुरतडणारे (कृंतक) प्राणी असे विविध प्राणी आहेत.
मांसाहारी प्राण्यातील कुळे
[संपादन]- सिंहाद्य (Felidae) यात सिंह, वाघ, बिबट्या, हिमबिबट्या, ढगाळ बिबट्या, चित्ता, जॅग्वार आदी विविध पशू आहेत.
- ऊदाद्य (Viverridae) यात मोठे, मध्यम व लहान ऊदमांजर यांचा समावेश आहे.
- नकुलाद्य (Herpestidae) यात मुंगूस प्राण्याचा समावेष आहे.
- तृक्षाद्य (Hyanidae) तृक्षाद्य कुळात तरस आहे.
- श्वानाद्य (Canidae) कोल्हा, खोकड, लांडगा, डिंगो, रान कुत्रा आदींचे कूळ श्वानाद्य आहे.
- ऋक्षाद्य (Ursidae) हे पिंगल, ध्रुवीय, मोठे, काळे, झिपरे वगैरे अस्वलांचे कूळ आहे.
- पंडाद्य (Alliluridae) लाल पांडा पंडाद्य कुळातील आहे.
- महापंडाद्य (Ailuropodidae) मोठा पांडा महापंडाद्य कुळातील आहे.
- मिंकाद्य (Mustelidae) वीझेल, एरमाईन मार्टेन वगैरे प्राणी मिंकाद्य कुळातील आहेत.
- राकूनाद्य}} (Procyonidae) रॅकून, पाणमांजर वगैरे राकूनाद्य प्राणी आहेत.
किटाहारी प्राण्यातील कुळे
[संपादन]- तरुचुंदराद्य} (Tupaidae) खारचिचुंदर, तरुचिचुंदर (Tree Shrew) हे प्राणी या कुळातील आहेत.
- चुंदराद्य (Soricidae) हे कूळ चिचुंद्रीचे आहे.
- मोल्लाद्य (Talpidae) मोल्ल (Shortailed mole) प्राणी मोल्लाद्य कुळातील आहे.
- शूकरकाद्य (Erinacidae) कुंपणडुक्कर (Hedgehog) या प्राण्याचे कूळ शूकरकाद्य आहे.
शाकाहारी प्राण्यातील कुळे
[संपादन]- हयाद्य (Equidae) हयाद्य हे घोडा, गाढव, खेचर, झेब्रा या प्राण्यांचे कूळ आहे.
- खड्गाद्य (Rhinoceridae) खड्गाद्य कुळात गेंडा आहे.
- तापीराद्य (Tapiridae) विविध तापीर या कुळात आहेत.
- गवयाद्य (Bovidae) रानगवा, याक, पाणम्हैस, कस्तूरी चमर, औरोख, बकरी, मार्खोर, ताहर, काईल, भराल, नयान, काळवीट, चिंकारा, नीलगाय, चौशिंगा, शाखाशिंग, ताकिन, सेरो, शामाय असे विविध प्राणी या कुळातील आहेत.
- सारंगाद्य (Cervidae) सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hogdeer) हे प्राणी सारंगाद्य कुळातील आहेत.
- उष्ट्राद्य (Camelidae) उंट, लामा, अल्पाका हे उष्ट्राद्य कुळातील आहेत.
- जिराफाद्य (Giraffidae) जिराफ, ओकापी जिराफाद्य कुळातील सदस्य आहेत.
- हयानूपाद्य (Hippopotamidae) पाणघोडा हयानूपाद्य कुळातील आहे.
- वराहाद्य (Suidae) रानडुक्कर वराहाद्य कुळातील आहे.
कृंतक प्राण्यातील कुळे
[संपादन]- शशाद्य (Leporidae) शश (Hare) आणि शशक (Rabbit) असे दोन्ही प्रकारचे ससे शशाद्य कुळातील सदस्य आहेत.
- मूषकाद्य (Muridae) उंदीर, घूस हे प्राणी मूषकाद्य कुळातील आहेत.
- कीचघूषाद्य (Rhizomyidae) छोटी आणि मोठी बांबू घूस कीचघूषाद्य कुळातील आहे.
- शायिकाद्य (Sciuridae) शायिकाद्य कुळात विविध खारी आणि मार्मोत प्राणी आहेत.
- शशुंदराद्य (Ochotonidae) शशुंदराद्य कूळ शशुंदर (Mousehare) प्राण्यांचे कूळ आहे.
- शलींदराद्य (Hystricidae) सायाळ प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
- बीव्हराद्य (Castoridae) बीव्हर प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
- चिंचिलाद्य (Chinchillidae) चिंचिल्ला प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
- मंदमूषकाद्य (Muscardinidae) झोपाळू उंदीर (Dormouse) प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.