चौशिंगा
Jump to navigation
Jump to search
चौशिंगा | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||
टेट्रासेरस क्वाड्रीकॉर्निस ब्लेनविल, १८१६ |
चौशिंगा (शास्त्रीय नाव : Tetracerus quadricornis ; इंग्लिश: Four-horned Antelope) हे दक्षिण आशियात आढळणारे हरीण आहे. चार शिंगे असली तरी याची वर्गवारी हरीणांच्या कुरंग कुळात होते. खरेतर चार शिंगे हे कुरंग हरीणांचे वैशिष्ट्य नाही परंतु कवटीच्या अभ्यासानंतर पुढील शिंगे ही केवळ कवटीमधील उंचवटे आहेत व मागील दोन शिंगे ही खरी शिंगे आहेत हे सिद्ध होते. तसेच मागील शिंगे ही इतर कुरंग हरीणांप्रमाणेच आहेत.
याचा वावर भारतात सर्वत्र आहे गंगेच्या खोऱ्यापासून ते तमिळनाडू पर्यंत त्याचा आढळ आहे. हे हरीण शुष्क जंगले पसंत करते. याची उंची ५० ते ६० सेमी इतकी असते तर वजन साधारणपणे २० किलो पर्यंत भरते.