कस्तुरीमृग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कस्तुरीमृग
Moschustier.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
(Artiodactyla)

कुळ: कस्तुरीमृगाद्य
(Moschidae)

ग्रे, इ.स. १८२१
जातकुळी: मोशस
(Moschus)

लिनिअस, इ.स. १७५८

कस्तुरी मृग (शास्त्रीय नाव: Moschus moschiferus मोशस मोशीफेरस ; इंग्लिश: Musk deer, मस्क डियर) हे कस्तुरीमृगाद्य कुळातील मोशस या एकमेव प्रजातीचे युग्मखुरी प्राणी आहेत. सारंगाद्य (सर्व्हिडी) कुळातील प्राण्यांपेक्षा - म्हणजे खर्‍या हरणांपेक्षा - कस्तुरी मृग अधिक पुरातन असून यांना सारंगाद्यांप्रमाणे शिंगे नसतात, तसेच स्तनाग्रांची एकच जोडी असते. तसेच यांना पित्ताशय, तसेच सुळ्यांसारखे दोन दात असतात; जे सारंगाद्यांमध्ये आढळत नाहीत. तसेच यांना कस्तुरी नावाचा तीव्र वासाचा स्राव स्रवणार्‍या कस्तुरी ग्रंथी असतात.

वैशिष्ठ्ये[संपादन]

कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० सेमी असते,त्यांची खांद्यापर्यन्तची अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.

कस्तुरी ग्रंथि नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो[१].

सांस्कृतिक संदर्भ[संपादन]

कस्तुरीमृग हा भारतातील उत्तराखंड राज्याचा राज्यपशु आहे.

तत्त्वज्ञान व साहित्यातील संदर्भ[संपादन]

कस्तुरीमृग व त्याच्या नाभीजवळील ग्रंथींमध्ये आढळणारी कस्तुरी यांच्या उपमा वापरून माणूस आणि अंतस्थ परमेश्वराच्या साक्षात्काराचे प्रतिपादन भारतीय उपखंडातल्या भक्तिमार्गी साहित्यात व तत्वज्ञानात अनेक वेळा केले आहे [२].

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिअन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  2. संत कबीर. कबीररचित साखी (मध्ययुगीन हिंदुस्तानी मजकूर). ""कस्तुरी कुंडली बसे मृग धुंडे बन माही"  Text " ऐसे घट घट राम हे दुनिया देखे नाही " ignored (सहाय्य); Text "" (अर्थ: ज्याप्रमाणे कस्तुरी हे बेंबीतच असते, पण कस्तुरी मृग ते सार्‍या जंगलात शोधतो, त्याचप्रमाणे देव प्रत्येकाच्या ह्रिदयात बसतो, पण लोक त्याला इतरत्र शोधतात) " ignored (सहाय्य)Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.