हिमबिबट्या
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हिमबिबट्या[१] | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
![]() आढळप्रदेश नकाशा
|
हिमबिबट्या (शास्त्रीय नाव : Uncia uncia; इंग्लिश: Snow Leopard) हा मार्जार कुळातील अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. याचा वावर मुख्यत्वे हिमालयातील उत्तुंग पर्वतरांगात आहे.
बिबट्यापेक्षा हा आकाराने काहीसा लहान असतो, पण त्याची शेपटी त्या मानाने मोठी असते.तो साधारण १००-११० सेमी असतो, व त्याची शेपटी साधारण ९० सेमी असते. ते समुद्र-सपाटीपासून साधारण १२-१२ हजार फुटांपर्यंत आढळतात. उन्हाळ्यात जेव्हा उंच कुरणे चरायला मोकळी असतात तेव्हा त्यांना गुराख्यांकडून पाळीव बकर्या, मेंढ्या घेऊन जाण्याची संधी मिळते.थंडीत ते साधारण ६हजार फुटांपर्यंत खाली येतात. इतर मांसभक्षी प्राण्यांप्रमाणेच त्यांच्या हालचाली त्यांच्या भक्ष्यांच्या हालचालींवर अवलंबून असतात. रानमेंढ्या, बकऱ्या, कृंतक, मार्मोट, कस्तुरी मृग आदि प्राण्यांचा त्याच्या आहारामध्ये समावेश होतो.
गर्भ धारण करण्याचा काळ तीन महिने असतो, व मादी २ ते ४ पिल्लांना जन्म देते. त्यांच्या कातडीसाठी त्यांची शिकार केली जाते.
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- हिमबिबट्या शिकार करताना बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.