ढगाळ बिबट्या
ढगाळ बिबट्या | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||
निओफेलिस नेब्युलोसा (ग्रिफिथ, १८२१) | ||||||||||||||
निओफेलिस नेब्युलोसा | ||||||||||||||
इतर नावे | ||||||||||||||
फेलिस मॅक्रोसेलिस |
ढगाळ बिबट्या (शास्त्रीय नाव: Neofelis nebulosa, निओफेलिस नेब्युलोसा ; इंग्लिश: Clouded Leopard, क्लाउडेड लेपर्ड) हा भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर राज्यातील तराईच्या जंगलात आढळणारा प्राणी आहे. याचा सर्वाधिक आढळ भूतानमध्ये आहे. ह्या प्राण्याला लामचित्ता असेही नाव आहे.
वर्णन
[संपादन]ढगाळ बिबट्या हा बिबट्या सदॄश दिसतो पण ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे. हा आकाराने खूपच लहान असतो व वजन जेमतेम २०-२२ किलोपर्यंत भरते. मांजरांमध्ये मार्जारकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमिनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते. तो पिल्लांना झाडाच्या ढोलीत वाढवतो[२].
मार्जार कुळातील मोठ्या मार्जारांमध्ये व ढगाळ बिबट्यांमध्ये कवटीची रचना व दात या दोन बाबतीत तफावत असते. ढगाळ बिबट्याचे वरचे सुळे इतर मार्जारांपेक्षा जास्त विकसित असतात.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ Cat Specialist Group (2002). Neofelis nebulosa. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this species is vulnerable
- ^ प्रेटर, एस.एच. द बुक ऑफ इंडिअन अॅनिमल्स [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- ढगाळ बिबट्या १ बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
- ढगाळ बिबट्या २ बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
- ढगाळ बिबट्या ३ बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |