लाजाळू
लाजाळू |
---|
जीवचौकट (संपादन)
वनस्पती प्रकल्प (संपादन)
|
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात.
लाजाळू | ||
---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||
|
लाजाळू फूल | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||
Mimosa pudica L.[१] |
लाजाळू' (लाजणारे) [ संस्कृत नाव - नमस्कारी,लॅटिन भाषेत=pudica = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होती तशी होतात. ही मुळात दक्षिण अमेरिकेची व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.
वर्णन
[संपादन]या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्षाच्या) दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागलेली असतात. अशा पानांना bipinnately compound पाने म्हणतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. पानाचे देठ (petioles) काटेरी असतात. फुलोऱ्याचा डेख-पुष्पबंधाक्ष (peduncle) फिकट गुलाबी किंवा जांभळट असून तो गुच्छ(flowerhead) पानाच्या बगलेतून (axil) फुटलेला असतो. फुलाचा खालचा भाग गोळीदार असून ८-१० मिलिमीटर व्यासाचा असतो. फुलाच्या पाकळ्या वरच्या भागी लाल असतात आणि त्यांचे तंतू जांभळट गुलाबी असतात. फुलांचे परागीभवन वाऱ्याने आणि कीटकांकडून होते. लाजाळूला हाताच्या बोटांप्रमाणे ७-८ शेंगा येतात. शेंगेत एकापुढे एक अशा २-४ बिया असतात. शेंगा काटेरी असतात.
भाषांतरास मदत कराThe leaves are bipinnately compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. Pedunculate (stalked) pale pink or purple flower heads arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10 mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The fruit consists of clusters of 2-8 pods from 1–2 cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5 mm long. The flowers are pollinated by the wind and insects.[२]
वनस्पतीची हालचाल
[संपादन]लाजाळू तिच्या त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श, गरम करणे, धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व तीदेखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.टर्गर दाब हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. Mimosaceae कुळांमधील झाडांमध्ये हा गुणधर्म असतो.
लाजाळूने ही पद्धत कां स्वीकारली हे कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्वसंरक्षणासाठी ते झाड असे करते. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे अशी त्यामागची कल्पना असावी.
नामकरण
[संपादन]लाजाळूचे Mimosa pudica।लॅटिन नांव''मायमोसा पुडिका'' Carl Linnaeus।कार्ल लिन्नाअस या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सन १७५३ ला Species Plantarum।स्पेसीज प्लँटेरम मध्ये हिचे वर्णन केले.[३] pudica,हे म्हणजे लॅटिन भाषेत त्याच्या स्पर्श केल्यानंतर होणाऱ्या प्रतिक्रियेनुसार "आकसणारे".("bashful" or "shrinking").
इतर नावे
[संपादन]ही वनस्पती खालील नावांनीही ओळखली जाते.
- संवेदनशील झाड[४]
- नम्र झाड[४]
- लाजणारे झाड[४]
- लाजरी
- Sensitive plant
- Humble plant
- लाजवंती, लज्जिका
- संकोचिनी
- झोपणारे गवत
- आकसणारे झाड
- सभ्य झाड
- स्पर्श-करू-नका(Touch-me-not) [४].
- छुई-मुई/लाजवंती (उर्दू/हिंदी)
आढळ
[संपादन]शेतीवर परिणाम
[संपादन]मका, नारळ, टमाटे, कापूस, कॉफी, केळ, सोयाबीन, पपई व ऊस इत्यादी पिकांसाठी लाजाळू ही वनस्पती त्रासदायक आहे. [२] हवाई बेटांमध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे.[२][५] ही वनस्पती हवेतून नत्रवायू शोषून स्वतःला व इतर झाडांना देते. Fabaceae वर्गाच्या वनस्पतींसाठी ही तशी साधारण गोष्ट आहे.
लागवड
[संपादन]लाजाळू ही वनस्पती अनेक घरांमध्ये आवडीने लावली जाते. जमीन आच्छादण्या/झाकण्यासाठी पण हिचा वापर करतात.
उपयोग
[संपादन]लाजाळूचे रोपटे अनेकदा एक खास भेट म्हणून दिले जाते. शाळेत वनस्पतींच्या अभ्यासाठी हे रोप आवर्जून जोपासले जाते..[६]
पुण्यातील लाजाळू
[संपादन]इ.स. २०००सालापर्यंत, निसर्गसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी लाजाळू वनस्पती पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाची ओळख होती. इंदापूर, दौंड, बारामती या परिसरात ती मोठ्या प्रमाणात आढळायची, पण आता अनेक कारणांमुळे ती या भागांतून हद्दपार झाली आहे.[७] वनस्पती शास्त्रज्ञांच्या दृष्टीने महत्त्वाची व सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय असलेली ही वनस्पती आता मोठ्या प्रमाणावर कोकणातच पहायला मिळते.
पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात इ.स. १९९०च्या सुमारास ओढे, नाले व ओलसर ठिकाणी लाजाळूचे अस्तित्त्व मोठ्या प्रमाणात होते. मात्र, त्या नंतरच्या दशकांत अवर्षणाचे वाढलेले प्रमाण, गावोगावचे नष्ट झालेले ओढे-नाले, उरलेल्या ओढे-नाल्यातून वाळूमाफियांनी केलेला वाळूउपसा व या कारणाने ओढे नाल्यांतील पाणी साठवून ठेवण्याची कमी झालेली क्षमता आणि त्यामुळे जमिनीतील नष्ट झालेला ओलसरपणा, वाढलेले प्रदूषण आदी कारणाने या परिसरातून लाजाळू वनस्पती नष्ट झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन रासायनिक घटकांचे व क्षारांचे वाढलेले प्रमाण आढळत असल्याने, या पाण्याचा परिणाम होऊन या वनस्पतीला पुणे जिल्ह्यात अखेरची घटका मोजावी लागली आहे.
औषधी उपयोग
[संपादन][१] Archived 2004-11-10 at the Wayback Machine.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ {{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ars-grin.gov/cgi-bin/npgs/html/taxon.pl?24405 |title=Mimosa pudica information from NPGS/GRIN |प्रकाशक=www.ars-grin.gov |अॅक्सेसदिनांक=2008-03-27
- ^ a b c "Mimosa pudica L." (PDF). 2008-03-25 रोजी पाहिले.
- ^ साचा:APNI
- ^ a b c d "Mimosa pudica L." Germplasm Resources Information Network (GRIN). 2008-03-22 रोजी पाहिले.
- ^ "Mimosa pudica (PIER species info)". 2013-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-03-25 रोजी पाहिले.
- ^ "The TickleMe Plant". 2008-03-22 रोजी पाहिले.
- ^ लाजरी लाजाळू पुण्याच्या पूर्व भागातून हद्दपार! – जिल्ह्य़ाची अनोखी ओळख हरवली. Loksatta (Marathi भाषेत). 28-05-2018 रोजी पाहिले.
हाताचा स्पर्श होताच पाणातील पेशी द्रव्य देठात जमा होऊन त्यामुळे पटापट पाने मिटवून घेणारी या तिच्या वैशिष्टय़पूर्ण कारणामुळे लाजाळू म्हणून ओळखली जाते. भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणामध्ये होत असल्याने एकंदरच जमिनीमधून ओलसरपणा नष्ट होत असल्याने व वाढलेल्या प्रदूषणामुळे लाजाळूबरोबरच माळरानावरच आढळणाऱ्या औषधी गुणधर्म असलेल्या अनेक महत्त्वाच्या वनस्पती ही गावोगावच्या शिवारातून हद्दपार झाल्या आहेत. रानरताळ, आगआगी, कडुंदरावन, रानवांगे या बरोबरच आहारात वापरल्या जाणाऱ्या पात्रा, कडवंची या रानभाज्याही नष्ट झाल्या आहेत.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |