इ.स. १९७३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९७० - १९७१ - १९७२ - १९७३ - १९७४ - १९७५ - १९७६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी १७ - फिलिपाईन्सने फर्डिनांड मार्कोसला आजन्म अध्यक्ष घोषित केले.
- जानेवारी २७ - १९७३चा पॅरिसचा तह. व्हियेतनाम युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
- फेब्रुवारी ९ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.
- फेब्रुवारी २१ - इस्रायेलच्या लढाउ विमानांनी लिब्याचे नागरी विमान पाडले. १०८ ठार.
- मार्च ३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.
- मे ८ - अमेरिकेच्या दक्षिण डाकोटा राज्यातील वुन्डेड नी येथील मूळ अमेरिकन व्यक्तिंचा ७१ दिवस चाललेला वेढा बिनशर्त शरणागती नंतर उठला.
- जून २६ - सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस ३-एम. प्रकारच्या रॉकेटचा स्फोट. ९ ठार.
- जुलै १० - बहामाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- जुलै १० - पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.
- जुलै ११ - ब्राझिलचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिस ओर्लि विमानतळावर कोसळले. १३४ पैकी १२३ प्रवासी ठार.
- जुलै २० - केन्याच्या अर्थमंत्री ज्युलियस कियानोने जाहीर केले की देशातील एशियन लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
- जुलै २० - पेलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी जपान एरलाइन्सचे विमान पळवून दुबईला नेले.
- जुलै २५ - सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित.
- जुलै ३१ - डेल्टा एरलाइन्सचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
- डिसेंबर १ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
जन्म
[संपादन]- जानेवारी २ - जॉन बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- मार्च ११ - केनेडी ओटिएनो, केन्याचा यष्टिरक्षक क्रिकेट खेळाडू, इ.स. १९९६ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहभाग.
- एप्रिल २४ - सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ८ - शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - कॅथ्रिन लेंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - कॉलिन स्टुअर्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - नीव्ह कॅम्पबेल, केनेडीयन अभिनेत्री.
- ऑक्टोबर २९ - ऍडम बाचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ८ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
- जानेवारी २२ - लिंडन बी. जॉन्सन , अमेरिकेचे ३६ वे अध्यक्ष
- मार्च ६ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- एप्रिल ८ - पाबलो पिकासो, स्पॅनिश चित्रकार
- एप्रिल २१ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- मे २ - दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
- जून ५ - माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
- जून ९ - एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसऱ्या महायुद्धातील जर्मन सेनानी.
- जुलै २५ - लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
- ऑगस्ट ६ - फुलजेन्सिओ बॅटिस्टा, क्युबाचा हुकुमशहा
- ऑगस्ट ७ - जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |