पॅरिस ओर्लि विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओर्लि विमानतळाचे आकाशामधून चित्र

पॅरिस ओर्लि विमानतळ (फ्रेंच: Aéroport de Paris-Orly) (आहसंवि: ORYआप्रविको: LFPO) हा फ्रान्सच्या पॅरिस शहरामधील एक विमानतळ आहे. फ्रान्सच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशामध्ये पॅरिसच्या १३ किमी दक्षिणेस स्थित असलेला ओर्लि चार्ल्स दि गॉल विमानतळ बांधण्यापूर्वी पॅरिस शहराचा प्रमुख विमानतळ होता.

आजच्या घडीला देशांतर्गत वाहतूकीसाठी ओर्लि हा फ्रान्समधील सर्वात वर्दळीचा विमानतळ व एअर फ्रान्सचा हब आहे. येथून कॅरिबियन, मध्य पूर्व, आफ्रिका इत्यादी प्रदेशांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील होतात.

गुणक: 48°43′24″N 2°22′46″E / 48.72333, 2.37944


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: