लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ, बॉस्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
बॉस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
Boston Logan International Airport
Logan Airport aerial view.jpg
आहसंवि: BOSआप्रविको: KBOSएफएए स्थळसंकेत: BOS
WMO: 72509
नकाशाs
विमानतळाचे रेखाचित्र
विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मॅसेच्युसेट्स पोर्ट ऑथोरिटी (मासपोर्ट)
कोण्या शहरास सेवा बॉस्टन
स्थळ ईस्ट बॉस्टन
हब
समुद्रसपाटीपासून उंची २० फू / ६ मी
संकेतस्थळ मासपोर्ट.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
4L/22R ७,८६१ २,३९६ डांबरी
4R/22L १०,००५ ३,०५० डांबरी
9/27 ७,००० २,१३४ डांबरी
14/32 ५,००० १,५२४ डांबरी
15L/33R २,५५७ ७७९ डांबरी
15R/33L १०,०८३ ३,०७३ डांबरी
सांख्यिकी (२०१२)
विमान आवागमन ३,५४,८६९
प्रवासी २,९३,२५,६१७
स्रोत: एफ.ए.ए.,[१] Massport.[२]

जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[३] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.

लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[४] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[५]

हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ . Retrieved February 3, 2012.
  2. ^ "विमानतळ सांख्यिकी". मासपोर्ट. 2011. February 3, 2012 रोजी पाहिले. 
  3. ^ http://www.bts.gov/publications/pocket_guide_to_transportation/2008/html/table_04_07b.html
  4. ^ "MASSPORT: Logan Airport: FAQ". 2008-09-26 रोजी पाहिले. 
  5. ^ http://www.massport.com/logan/about_histo.html