मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.
सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.
"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.
पाने सांख्यिकी
लेख
३४,५४४
पाने
(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)
१,०९,५३४
चढवलेल्या संचिका
३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने
९,६८,६९३
प्रतिपान संपादने
८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य
२२,०८४
कार्यरत सदस्य
(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)
१९०
सांगकामे
६०
प्रचालक
१२
स्वीकृती अधिकारी
२
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी
कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
१५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अॅप' निर्माण करण्यात आल्या.
* ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
* १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
* १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
* २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.
२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम
३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
१० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
१० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
१७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
१८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
२० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
२५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता
मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.
विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.
मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.
परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.
नवीन नियुक्ती
मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.
माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.
'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!
राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.
नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.
पाने सांख्यिकी
लेख
३४,७९७
पाने
(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)
९६,२४०
चढवलेल्या संचिका
३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने
९,३२,७५०
प्रतिपान संपादने
९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य
२१,१५१
कार्यरत सदस्य
(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)
१९०
सांगकामे
६०
प्रचालक
१२
स्विकृती अधिकारी
१
प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.
"CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.
२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम
६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
१५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
१५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
२९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.
या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.
महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
नमस्कार Dakutaa,
आपले मराठी विकिवर स्वागत आहे.
बंगाली भाषेवरील आपला लेख एकदम मस्त बनत आहे.
आपली मातृभाषा बंगाली का? तसे मराठी व बंगाली दोन्हींवरची आपली पकड जाणवते. सत्यजित राय, रविंद्रनाथ टागोर, शरत चंद्र चट्टोपाध्याय तसेच इतर बाग्ला मान्यवरांवरील लेखांमध्येपण आपण योगदान करू शकता, ज्ञानकोशात अमूल्य भर पडेल.
आपणास काही मदत लागल्यास आपण चावडीवर विचारू शकता. padalkar.kshitij १८:३५, ६ नोव्हेंबर २००८ (UTC)
वा, उत्तमच.
अजून एक, कुणा सदस्याच्या चर्चा पानावर वा चावडीवर संदेश लिहिल्यावर तुम्ही ~~~~ असे लिहून स्वतःची स्वाक्षरी करू शकता.
यामुळे कोणी/केव्हा संदेश लिहिला हे कळेल व त्या सदस्याला तुमच्याशी संपर्क साधता येईल. माझी खालील स्वाक्षरी व वेळ मी ~~~~ वापरून केली आहे. padalkar.kshitij ०६:३८, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
नमस्कार Dakutaa,
आपले तबला या लेखातील योगदान बघितले.
मला संगितातील काही माहित नाही आहे, पण एक शंका होती. ताल व तालांबद्दलची माहिती वेगळ्या लेखात टाकावी का?
म्हणजे, खालीलप्रमाणे एक स्वतंत्र व अत्यंत उपयुक्त लेखमालाच आपण बनवू शकतो.
ताल : यामध्ये तालाबद्दल सामान्य माहिती असेल.
तालांची यादी : यामध्ये सर्व तालांची यादी असेल. यात ताल-जातींनुसार तालांची विभागवारी असू शकते.
ताल 'अ'
ताल 'ब'
....
असे प्रत्येक तालांबद्दलचे एक-एक लेख असतील.
आपण अशी यादी बनवू शकता का?
Let's do it systematically, आपण आधी हे निश्चित करूया की किती व कोणते लेख बनवावे.
तसेच प्रत्येक तालासाठी एक stub (लेख-स्वरूप) निश्चित करूया. जर आवश्यकता असेल तर आपण एक माहितीचौकट साचा बनवू शकतो.
तालांची यादी व माहिती मला इथे भेटली आहे.
ही लेखांची व तालांची यादी कशी असावी तसेच प्रत्येक तालाच्या पानाचे स्वरूप काय असावे ते सुचवावे. क्षितिज पाडळकर ०६:४७, १६ डिसेंबर २००८ (UTC)
क्षितिज,
नमस्कार ! हे बघा. ही तालांची तालिका (लिस्ट) आहे.
अशी तालिका आपण तयार करुयात. आपण तालिका बनवलीत तर मी एकेक लेख संपादित करत् जाईन.
(या विषयावरील सर्व चर्चा एकाच जागेवर असाव्यात म्हणून आपली चर्चा इथे paste करत आहे.)
>> ताल व तालांबद्दलची माहिती वेगळ्या लेखात टाकावी का?
उत्तम कल्पना;
>> ताल उपांग म्हणजे काय?
तालावर आधारित ठेक्याचे विविध प्रकार. म्हणजे समजा १२ मात्रेचा चा १ ताल आहे. तर तित्क्याच मात्रा असलेले बाकी विविध ठेके; तालामागोमाग येतात त्याला ताल उपांग म्हटलेय.
>> मला बंगाली वाचता येत नाही ना पण :)
नाही; मला खाली त्यांनी केलेली लिस्ट दाखवायची होती. त्या पानावर एका चौकटीत सारे ताल लिहिले आहेत. त्यामुळे एका तालावरुन दुसर्या तालावर सहज जाता येते. तसे काहीतरी आपण करावे. कदाचित तुम्ही त्या बद्दलच बोलत आहात.
>> सर्व तालांच्या लेखांचे एकच स्वरूप मी यासाठी म्हणत आहे, की त्यामुळे त्या सर्व लेखांत समानता असेल.
एक शंका. काही ताल (जसे त्रिताल) इतर तालांपेक्षा जास्त समृद्ध आहे; त्यात जास्त विविधता दिसते ती जुन्या तालात नाहीये. मग एकीकडे जास्त शीर्षके दुसरीकडे कमी अशी flexibility यात असेल काय ?
>> स्वरुप
ढोबळ स्वरुप आपण लिहिले तेच आहे.
मी दिलेल्या लेखात केवळ २ उपांगे दिली आहेत. उद्या नवीन लेखकास आणखी उपांगांची भर टाकाविशी वाटली ( जसे यात नसलेली त्रिपल्ली) तर ते स्वातंत्र्य stub मुळे त्याच्यापासून हिरावले जाऊ नये ही काळजी ::आपण आधीच घ्यावी असे वाटते.
ओके, प्रथम ताल हा वेगळा लेख बनवूया, जेथे तालाबद्दलची माहिती टाकली जाईल. तबला मधील माहिती तुम्ही इथे टाकू शकता.
बंगाली विकिप्रमाणे लिस्टची चौकट मी बनवितो, तुम्ही कोणकोणते ताल या लिस्टमध्ये टाकायचे ते सांगा.
तसेच स्वरूपाबद्दलचे आपले म्हणणे बरोबर आहे, flexibility कमी करणे योग्य नाही. आपण ताल उपांगामध्ये उपविभाग टाकू नयेत. फक्त ताल उपांग हा विभाग बनवावा व जर तालाची आवश्यकता असेल तर या विभागात उपविभाग करता येतील. म्हणून प्रथम आपण सर्व तालांची खालील स्वरूपात पाने बनवू या व त्यानंतर एका-एका तालाचे पान विकसित करता येईल. (इंग्रजी विकिवर सहसा अशीच पद्धत वापरली जाते, तिथे एका विशिष्ट स्वरूपातील रिकामी पाने आधी करून ठेवली जातात व यामुळे नवीन सदस्यांना पानांवर अधिक माहिती टाकतांना एकप्रकारची guideline मिळते. उदाहरणादाखल मराठी विकिवरपण प्रकल्प:लोकसभा यामध्ये अशी रिकामी पाने तयार करून ठेवली आहेत. )
प्रत्येक तालासाठी अशी माहितीचौकट कशी वाटते? यामध्ये अजून काही टाकता येऊ शकते का? तसेच प्रत्येक लेखाखाली बंगाली विकिप्रमाणे तालांची लिस्ट ठेवता येईल. (ती मी साचा:मार्गक्रमण ताल या नावाने नंतर बनवितो.)
यामुळे पानाचा stub खालीलप्रमाणे होईल.
{{माहितीचौकट ताल
| नाव =
| मात्रा =
| विभाग =
| टाळी =
| खाली =
| जाती =
}}
{{विस्तार}}
== परिचय ==
== बोल ==
== ताल उपांग ==
== बाह्यदुवे ==
{{मार्गक्रमण ताल}}
[[वर्ग: ताल]]
मी साचा:मार्गक्रमण ताल बनविला आहे, तालांची यादी मी इथून घेतली आहे.
कृपया त्यातील तालांचे भाषांतर करावे, मग मी ती सर्व पाने stub नुसार तयार करतो. क्षितिज पाडळकर २२:२३, १६ डिसेंबर २००८ (UTC)
भाषांतर पूर्ण केले आहे.
एक प्रश्न आहेअ. लेखातील subarticle चा दुवा कसा देतात ?
मला यादीतील लय शब्दासाठी तबला लेखातील लय श्ब्दाचा दुवा द्यायचा आहे.
Dakutaa, मी सर्व लेख stub नुसार तयार केले आहेत.
तुमच्या सवडीने तुम्ही त्यात माहिती टाका.
तसेच मी तबला येथील माहिती ताल या लेखात टाकली आहे. माझ्या मते, तबला लेखात फक्त पारिभाषिक शब्दांची थोडक्यात ओळख असावी.
आणि लेखातील विभागाचा दुवा देण्यासाठी [[लेखनाव#विभाग_नाव]] असे वापरा. उदा. लय हा "लय" विभागावर जाणारा दुवा आहे.
नमस्कार Dakutaa,
आपण मराठी टंकलेखनासाठी कोणती प्रणाली वापरता? जर आपण Baraha वापरत असाल तर "|" ही कळ (कळपटावरील Backspace च्या खालची) मराठी भाषेत योग्यप्रकारे येत नाही.
For wiki links we have to use PIPE (|), and if we are using Baraha then what we get is "हिंदी पूर्णविराम (।)" (दोन्ही दिसायला थोडेसे सारखेच आहेत,पण हिंदी पूर्णविराम थोडा उंचीला छोटा असतो).
असो, as a work-around, if you are using Baraha, then switch to English and give pipe. That will solve the problem. क्षितिज पाडळकर १५:३७, २ जानेवारी २००९ (UTC)
पहिले वाक्य नेहमी लेखविषयाची व्याख्या असावी. शक्यतो पहिला शब्दसमूह लेखाचे नाव असावे. पहिले वाक्य पूर्ण वाक्य असावे, उदा- पुस्तके व संदर्भग्रंथ एकत्रीतपणे ठेवण्याची जागा. च्या ऐवजी ग्रंथालय पुस्तके व संदर्भग्रंथ एकत्रीतपणे ठेवण्याची जागा आहे.
लेखनावाचे इंग्लिश भाषांतर लेखात देऊ नये, त्याऐवजी इंग्लिश (किंवा इतरभाषीय) आंतरविकि दुवा द्यावा.
लेखाचे वर्गीकरण करावे.
यातील अनेक गोष्टी तुम्ही करीतच आहात. उरलेल्याही कराव्यात ही विनंती.
Dakutaa,
इंग्रजी विकिवर या लेखात लिहिले आहे खालील नृत्यांना संगीत नाटक अकादमी "भारतीय अभिजात नृत्य" म्हणून मान्यता देते.
The Sangeet Natak Akademi currently confers classical status on eight Indian dance forms:[citation needed]
Bharatanatyam - Tamil Classical Dance
Odissi - Orissa Classical dance
Kuchipudi - Telugu Classical dance
Manipuri - Manipur Classical Dance
Mohiniaattam - Kerala Classical Dance
Sattriya - Asamese Classical Dance
Kathakali - Malayalam Classical Dance
Kathak - North Indian Classical Dance
यामध्ये यक्षगानाचा उल्लेख नाही आहे (आणि आपण Sattriya गाळले आहे). या यादीनुसारच तेथे साचा बनविण्यात आला आहे.
संगीत नाटक अकादमीच्या संकेतस्थळावर मलातरी वरील यादीला संदर्भ सापडला नाही आहे.
पण तरीही, जोपर्यंत काही pro किंवा cons संदर्भ सापडत नाही तोपर्यंत इंग्रजी विकिला प्रमाण मानावे असे मला वाटते.
यावर अजून एक उपाय म्हणजे साच्यामध्ये इतर मथळ्याखाली यक्षगान (तसेच Kuttiyattam ) टाकणे.
आपले यावर मत काय आहे? क्षितिज पाडळकर १६:२६, ६ जानेवारी २००९ (UTC)
चालेल.
आपण यक्षगान व Kuttiyattam (याचा संदर्भ संगीत नाटक अकादमीच्या संकेतस्थळावर आहे) साच्यामध्येसुद्धा टाकू शकतो.
तुम्ही सांगितलेले चित्र काढले आहे. सर्वसाधारण सदस्यांना पाने वगळण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काढावेसे वाटत असलेल्या पानावर {{पानकाढा}} लिहिले असता मी किंवा एखादा प्रशासक (एकदा नजरेखालून घालून मग) ते पान काढेल.
विकिमीडियाचे (व पर्यायाने विकिपीडियाचे) चित्रपट पोस्टरबाबतची भूमिका आहे की जरी पोस्टर प्रताधिकारित असले तरी त्याची पुसट आवृत्ती चित्रपटाबद्दलची माहिती देण्यासाठी वापरणे योग्य आहे. तुम्ही हे चित्र चढवलेत तर हा साचा त्यात घालावा.
सहमत. अमेरिकेबाहेर जग आहे अशी जाणिव बिचार्यांना नसते :)
Dakutaa ०५:१६, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)
:: तेथे त्यांचे बदल करण्याचीवी तयारी दिसत नाहिये... त्यांना ते डिफेंड करतायेत की तेच बरोबर आहे, कारण अशी 'सिस्टिम' जगात कुठे नाहीच! डोक्यावर हात मारून घेतला अजून काय करणार? निनाद १०:२३, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)
धन्यवाद, आपले सहकार्य लाभल्यास प्रकल्प लवकर पूर्ण होईल.
या लोकसभा निवडणुकां आधी मला लोकसभा प्रकल्प ही पूर्ण करावयाचा आहे. आपले सहकार्य व मत प्रकल्प:लोकसभा मांडावे.
सध्या मला प्रत्येक (निदान महाराष्ट्र) मतदारसंघातील नामांकन ही टाकावे असे वाटते.
नमस्कार, Dakutaa आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.
If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १३:०४, १६ जुलै २००९ (UTC)
नमस्कार, Dakutaa आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..
जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.
पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.
आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:१२, ११ जून २०१२ (IST)[reply]
आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.
आपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.
अर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.
सुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).
आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.
आपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.
अर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.
सुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).
कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.