सदस्य चर्चा:Fleiger
स्वागत | Fleiger, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Fleiger, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४८५ लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
Request for Help
[संपादन]Greetings Fleiger!
Do you know the Marathi equivalents for the following English words?:
- Jesus Christ
- Baptism
- Washing of the Feet
- Holy Spirit
- Salvation
- Holy Communion
- The Church
- Final Judgement
- Holy Bible
- Sabbath Day
If possible, can you please kindly help me translate them into Marathi?
Any help at all would be appreciated, --Jose77 03:29, 25 ऑक्टोबर 2006 (UTC)
- Thankyou very much Fleiger for your help! --Jose77 04:56, 25 ऑक्टोबर 2006 (UTC)
तू पेरुगेटचा माजी विद्यार्थी आहेस का रे?
[संपादन]अमेय,
तू पेरुगेटचा माजी विद्यार्थी आहेस का? माझ्या आठवणीत १९९७ दहावी बॅचला 'अमेय चिंचोरकर' होता. मीदेखील पेरुगेटचाच. १९९६ दहावी बॅच.
--संकल्प द्रविड 17:31, 25 ऑक्टोबर 2006 (UTC)
English Wikipedia वरील नवीन "Userbox"
[संपादन]अमेय,
That's a fine idea. To start with, encourage all mr/en users on Marathi wikipedia by publishing this userbox on चावडी. Next, write messages on en/mr users (primarily writing on english wikipedia, but associated with marathi/maharashtra) and use this userbox as part of your signature/signoff.
That should get attention of a few. Once you advertize this userbox on चावडी and solicit suggestions, I'm sure we can think of other ways.
Regards,
अभय नातू 04:16, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)
गौरव
[संपादन]Fleiger ,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.For your act of kindness towards Marathi Langauge Wikipedia and interwiki co-operation.You are welcome to visit आंतरविकि दूतावास.
Mahitgar 04:53, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)
दुवेजोड रिपीट न करण्याबद्दल...
[संपादन]अमेय,
तू लिहिलेला कर्ण लेख बघितला. त्यात दुर्योधन, पांडव, अर्जुन या वारंवार येणार्या प्रत्येक शब्दाला त्या-त्या लेखांचे दुवे जोडले होते. ते अनावश्यक होते. अशा शब्दांच्या पहिल्या 'occurence 'लाच दुवा जोडावा; नंतर जोडू नये असा विकिपीडिया(/विकिपिडीया :-) )वर संकेत आहे.
क. लो. अ., --संकल्प द्रविड 13:53, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)
महाभारतीय व्यक्तिरेखांच्या नावांचे शुद्धलेखन
[संपादन]अमेय,
'Category:महाभारतातील व्यक्तिरेखा' मधील व्यक्तिरेखांच्या नावांचे लेखन मूळ संस्कृत नावांप्रमाणे करायला हवे असे मला वाटते. कारण व्यक्तिवाचक नावे तत्सम (संस्कृतमधून आलेले शब्द) प्रकारात मोडतात; आणि तत्सम शब्द हे मूळ संस्कृत नावांप्रमाणेच लिहिले जातात. उदा.: 'पुरू'(दीर्घ रू)ऐवजी 'पुरु'(र्ह्स्व रु) हे लेखन शुद्ध आहे. तुला नेटवरून शोध घेऊन महाभारताच्या मूळ संस्कृत संहितेतील नावांचा संदर्भ घेऊन या दुरुस्त्या करता येतील का?(तसे करताना चुकीच्या शीर्षकांचे लेख शुद्ध शीर्षकाला स्थानांतरित करावे लागतील.)
--संकल्प द्रविड 14:14, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)
Sherlock and copyright
[संपादन]Sherlock Holmes चा उच्चार "शरलॉक" असा केला जात असल्याने मी त्या नावाने पान बनविले होते.
तसेच, "अंतू बर्वा" हा संपूर्ण लेख सध्या विकिबूक्स वर असून त्याचा दुवा "व्यक्ती आणि वल्ली" ह्या लेखात आहे. हा लेखावर मौज प्रकाशन आणि पु ल देशपांडे फाऊंडेशन ह्यांचा copyright आहे. त्यामुळे ह्या लेखाचा दुवा काढून टाकावा असे माझे मत आहे. ह्या दोनही बाबतीत विकिपिडीयाचा काय संकेत आहे?
Usually, we try and stick to the native pronunciation. Exceptions can be made in cases where the word in question is already en vogue in Marathi. I believe शेरलॉक होम्स has been made famous in Marathi as शेरलॉक. A request for clarification on चावडी will allow others to weigh in.
Copyrighted material is not allowed on wikipedia in most cases. Excerpts of such materials can be written here, provided it is to illustrate the material in question. I will put a notice on the page mentioned to remove it and remove it from wikipedia in a few days.
तसेच Detective ला मराठी प्रतिशब्द न सापडल्याने मी "सत्यान्वेशी" हा ब्योमकेश बक्क्षी कथांमध्ये वापरलेला शब्द वापरत आहे. मला गुन्हे अन्वेषकापेक्षा हा शब्द अधिक सुयोग्य वाटतो. तरी Detective ला मराठी प्रतिशब्द असल्यास कळवावे.
I know not of any such word in marathi. चावडी or मनोगत.कॉम users may have suggestions.
On a side note, not every word here has to be a Marathi equivalent of a foreign language word. Some words have no parallel in Marathi and inventing जडजंबाल words (mostly derived from Sanskrit) sometimes yields laughable results. In my opinion, सत्यान्वेशी is fine for a detective, but I will defer the final say to language experts.
Regards,
अभय नातू 02:07, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
मी होम्सच्या कथा मराठीतून वाचल्या आहेत तीत 'गुप्तहेर' हा शब्द वापरला आहे. सत्यान्वेशी हा शब्द खूपच जटील आहे व वाचकांना याचा बोध होणार नाही. महाविकी 02:31, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
- मी चावडीवर ह्या बाबतीत लोकांना विचारीन.
- तसेच, गुप्तहेर हा माझ्या मताने "spy" चे भाषांतर आहे. मी पण प्रथम गुप्तहेर हाच शब्द वापरणार होतो, परंतु त्याचा अर्थ निराळा होत असल्याने मी तो शब्द वापरला नाही. "सत्यान्वेशी" हा शब्द जटील आहे, पण जर चावडीवरील मत तसेच असेल, तर मी "डिटक्टिव" शब्द वापरणे जास्त योग्य समजीन. - Fleiger 03:00, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
Detective गुन्हा अन्वेषक अन्वेषण
[संपादन]Detective:गुन्हा अन्वेषक Deatection(Search for):गुन्हा अन्वेषण To remember Marathi words many times I found online dictioneries helpfull links to them are given at इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा. In this partcular case I used Spoken Sanskrit Dictionery Reagards Mahitgar 14:43, 6 नोव्हेंबर 2006 (UTC) Mahitgar 14:43, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
- मी म्हणाल्याप्रमाणे, "गुन्हा(/गुन्हे) अन्वेषक" हा शब्द Detective प्रमाणे चटकन सुचणारा, किंवा सर्वांच्या ओळखीचा नाही (मी वापरलेला शब्द सुद्धा तसा "जड"च आहे). मला एकच शब्द हवा होता, परंतु सर्वांचे ह्या विषयावर एकमत असेल तर आपण बदल करू शकतो.
- - Fleiger 15:34, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
Re: महाभारत संदर्भ
[संपादन]अमेय, महाभरताविषयी ऑनलाईन सापडलेले संदर्भ:-
- sacred-texts.com महाभारताची संस्कृत संहिता
- इंग्लिश विकिवरील महाभारत लेख - यातील बाह्यदुवे पाहा.
अजून एक ऑफलाईन संदर्भ आहे - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी लिहिलेला 'प्राचीन भारतीय चरित्रकोश' नावाचा ग्रंथ. माझ्याकडे घरी आहे. मी त्यातही तुला हवी असलेली नावे धुंडाळून बघू शकेन.
BTW, सत्यान्वेशी हा शब्द बहुदा सत्यान्वेषी असा लिहिला गेला पाहिजे. खात्री करून सांगेन. तसेच detective करता अन्य काही शब्द आहे का हेही बघेन.
-संकल्प द्रविड 08:58, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
'Template:पुस्तक' च्या अनुषंगाने..
[संपादन]अमेय,
तू बनवलेला 'Template:पुस्तक' हा साचा पाहिला. त्यात अजून काही सुधारणा करता येतील. उदा. साहित्यकृतीची भाषा देखील लिहिणे गरजेचे आहे. तुला संदर्भ म्हणून इंग्लिश विकिपीडियावरील ही टेम्प्लेट उपयोगी पडू शकेल: en:Template:Infobox Book
तसेच en:Category:Publishing infobox templates हा इंग्लिश विकिपीडियावरील विभागही बघ. यातील संदर्भांचा वापर करून तुला 'पुस्तक' साचा आणखीन चांगला बनवता येईल अशी आशा आहे.
--संकल्प द्रविड 19:59, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)
विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
[संपादन]
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.