आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.
विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.
अद्याप बर्याच विषयांवर मराठी विकिपीडियात पुरेसे लेखन होणे बाकी आहे.मराठी विकिपीडियास स्वयंसेवी मराठी लेखक आणि संपादकांची नितांत गरज आहे. सध्याच्या लेखकांवरील हा संपादन भार हलका करण्याकरिता तसेच किमान १,११,१११ लेखांचे ध्येय गाठणयाच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास प्रत्येक मराठी माणसाकडून फुल न फुलाची पाकळी, लेखन करून हवे आहे.यास्तव मराठी विकिपीडियाचे तुम्हाला आवडलेले फायदे तुमच्या प्रत्येक मराठी व्यक्तिस आवर्जून सांगावेत व मराठी विकिपीडियास संपादन सहाय्य देववावे हि नम्र विनंती.त्याच प्रमाणे मराठी विकिपीडिया आपल्या कडून इतर सहकार्याचेसुद्धा स्वागत करते.
मराठी विकिपीडिया विश्वकोशास स्वत:च्या मर्यादीत परिघाच्या कक्षेत येणार्या आपल्या सर्व अपेक्षांना ऊतराई होण्यास, येथिल ज्ञान आपल्या व्यक्तिगत आणि तुमच्या आप्तेष्टांच्या तसेच मराठी समाजाच्या उन्नतीत भर घालणारे व्हावे,यांकरिता आपल्या सदिच्छांची आणि सक्रीय पाठबळाची नितांत आवश्यकता आहे.
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.