Jump to content

शुक्राचे अधिक्रमण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जून २०१२ शुक्राच्या अधिक्रमणाचे चित्रचेतनीकरण
बिजींग येथून दिसू शकेल असे शुक्राचे अधिक्रमण (संगणकीकृत नक्कल)

शुक्राचे अधिक्रमणही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा शुक्र ग्रह सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला शुक्राचे अधिक्रमण[श १] असे म्हणतात. आपल्याला (पृथ्वीवरून) फक्त बुध व शुक्र यांचीच अधिक्रमणे दिसतात. अधिक्रमणाच्या काळात शुक्र एका बिंदुरूपात सूर्यबिंबावर दिसतो. शुक्राचे अधिक्रमण हे चंद्रामुळे घडणाऱ्या सूर्यग्रहणासारखेच असते. शुक्राचा व्यास चंद्रापेक्षा तीनपट मोठा असला तरी तो पृथ्वीपासून चंद्रासापेक्ष खूप दूर असल्यामुळे शुक्र सूर्यावर छोट्या टिकलीसारखा दिसतो तसेच हळू हलतो. शुक्राचे अधिक्रमण काही तास चालते. (२०१२ मधील अधिक्रमण ६ तास ४० मिनिटे शुक्राचे अधिक्रमणही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा शुक्र ग्रह सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला शुक्राचे अधिक्रमण[श १] असे म्हणतात. आपल्याला (पृथ्वीवरून) फक्त बुध व शुक्र यांचीच अधिक्रमणे दिसतात. अधिक्रमणाच्या काळात शुक्र एका बिंदुरूपात सूर्यबिंबावर दिसतो. शुक्राचे अधिक्रमण हे चंद्रामुळे घडणाऱ्या सूर्यग्रहणासारखेच असते. शुक्राचा व्यास चंद्रापेक्षा तीनपट मोठा असला तरी तो पृथ्वीपासून चंद्रासापेक्ष खूप दूर असल्यामुळे शुक्र सूर्यावर छोट्या टिकलीसारखा दिसतो तसेच हळू हलतो. शुक्राचे अधिक्रमण काही तास चालते. (२०१२ मधील अधिक्रमण ६ तास ४० मिनिटे चालले.)

शुक्राची अधिक्रमणे खूपच दुर्मिळ असतात. १२१.५ वर्षांनंतर आठ वर्षांच्या अंतराने दोन व परत १०५.५ वर्षांनंतर आठ वर्षांच्या अंतराने दोन अशी चार अधिक्रमणे २४३ वर्षात होतात व नंतर हा क्रम चालत राहतो. चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.

शेवटचे शुक्राचे अधिक्रमण ५ व ६ जून २०१२ रोजी होते व ते २१व्या शतकातील शेवटचे अधिक्रमण होते. याअधीचे अधिक्रमण २००४ मध्ये घडले. याअधीची अधिक्रमणांची जोदी डिसेंबर १८७४ व डिसेंबर १८८२ मध्ये होती तर यानंतरची जोडी डिसेंबर २११७ व डिसेंबर २१२५मध्ये असेल.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.

शुक्राची अधिक्रमणे खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचा उपयोग करून सूर्यमालेच्या आकारमानाचा अंदाज मांडण्यात आला होता. इ.स. १६३९ मधील अधिक्रमणादरम्यान पॅरालॅक्स सिद्धांत वापरून सूर्य व पृथ्वीमधील अंतर मोजले गेले. हे त्याकाळच्या इतर अंदाजापेक्षा अधिक अचूक होते. तसेच २०१२ मधील अधिक्रमणकाळात दूरवरचे ग्रह शोधून काढण्यात याचा उपयोग केला शुक्राची अधिक्रमणे खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचा उपयोग करून सूर्यमालेच्या आकारमानाचा अंदाज मांडण्यात आला होता. इ.स. १६३९ मधील अधिक्रमणादरम्यान पॅरालॅक्स सिद्धांत वापरून सूर्य व पृथ्वीमधील अंतर मोजले गेले. हे त्याकाळच्या इतर अंदाजापेक्षा अधिक अचूक होते. तसेच २०१२ मधील अधिक्रमणकाळात दूरवरचे ग्रह शोधून काढण्यात याचा उपयोग केला गेला.

वैज्ञानिकांच्या दृष्टीकोनातून मागोवा

[संपादन]

शुक्राच्या अधिक्रमणाच्या काळातील फरकामुळे काही वैज्ञानिकांच्या संपूर्ण हयातीतही शुक्राचे अधिक्रमण घडून येत नाही. निकोलस कोपर्निकसच्या हयातीत शुक्राचे अधिक्रमण झाले पण दूरदर्शक नव्हता आणि सूर्यप्रतिमा घेण्याच्या पद्धतीही कदाचित माहिती नव्हत्या. केप्लरने शुक्राच्या अधिक्रमणाचे भाकीत केले पण ते घडेपर्यंत तो जगला नाही. गॅसेंडीने बुधाचे अधिक्रमण पाहिले पण शुक्राचे अधिक्रमण युरोपमधून दिसलेच नाही. गॅलिलिओला याबाबत माहिती होते पण तोपर्यंत त्याची दृष्टी गेलेली होती. इ.स. १६३१ आणि इ.स. १६३९ची शुक्राच्या अधिक्रमणाची जोडी होऊन गेली आणि त्यानंतर इ.स. १६४२ मध्ये न्यूटनचा जन्म झाला. या शतकभराच्या कालावधीच्या सुरुवातीलाच तो जन्मल्यामुळे त्याच्या हयातीत एकही शुक्राचे अधिक्रमण झाले नाही. हॉरॉक्स या खगोलशास्त्रज्ञाने इ.स. १६३९ च्या अधिक्रमणावेळी काही गृहीतके मांडून सूर्य आणि पृथ्वी यातील अंतर मोजण्याचा प्रयत्न केला.

इ.स. २०१२ चेअधिक्रमण

[संपादन]
भारतातून शुक्राचे अधिक्रमण - ६ जून २०१२ रोजी सकाळी ६.०० ते १०.२२ वा. असे दिसेल. (चलचित्र)

६ जून, इ.स. २०१२ रोजी शुक्राचे अधिक्रमण घडले. पुन्हा पुढे १०५ वर्षे म्हणजेच इ.स. २११७ पर्यंत ते घडणार नाही. ६ जून, २०१२ रोजी सूर्योदयापासून सुमारे सव्वादहापर्यंत (भारताच्या पूर्वेला १०:२० (भाप्रवे) वाजेपर्यंत आणि पश्चिमेला १०:२३ (भाप्रवे) वाजेपर्यंत) हे अधिक्रमण दिसले.

थेट प्रक्षेपण

[संपादन]

खालील संकेतस्थळांवरून शुक्राचे अधिक्रमणाचे थेट प्रक्षेपण केले गेले.

इ.स. २००४ चे अधिक्रमण

[संपादन]

अधिक्रमण पाहण्याच्या सुरक्षित पद्धती

[संपादन]

अधिक्रमण पाहणे म्हणजे थेट सूर्याकडे पाहणे जे आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे. त्यामूळे नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणे कधीही टाळावे. त्यामूळे शुक्राचे अधिक्रमण पाहण्याच्या विविध पद्धती खाली दिल्या आहेत.

  1. नुसत्या डोळ्यांनी शुक्राचे अधिक्रमण पाहण्याचे सुरक्षित साधन ' सौरचष्मा '.
  2. टेलेस्कोप, बायनोक्युलरद्वारे सूर्याची प्रतिमा कागदावर घेणे.
  3. सूर्याला पाहण्याची काच किंवा १४ क्रमांकाची वेल्डींगची काच वापरून सूर्याला पाहणे.

पारिभाषिक शब्दसूची

[संपादन]
  1. ^ a b शुक्राचे अधिक्रमण (इंग्लिश: Transit of Venus, ट्रांझिट ऑफ व्हिनस)

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • डॉ.विवेक मांटिरो. शुक्राच्या अधिक्रमणाचा प्रयोग २००४ (PDF). १८ मे, २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]